Home पुणे हनुमान नगर” राऊतवाडी” येथे “अग्नितांडव” 🛑

हनुमान नगर” राऊतवाडी” येथे “अग्नितांडव” 🛑

110
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 हनुमान नगर” राऊतवाडी” येथे “अग्नितांडव” 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोथरूड :⭕स्थानिक नगरसेवक मा. “दिपकभाऊ मानकर” यांचे स्वीय सहाय्यक मा. “दिलीपकाका कानडे” यांच्या व “दिवा प्रतिष्ठाचे” कार्यकर्ते व स्थानिक महिला, गणेश मंडळांच्या कार्यकर्ते व शेजारील लोकांच्या मदतीने आग विजविण्यात यश आले.

अन्यथा खूप मोठी हानी झाली असती, याची कल्पना देखील आपण करू शकत नाही.

शनिवार दिनांक २०.०३.२१ रोजी, सकाळी आपल्या सर्वे नंबर ४४ राऊतवाडी भागातील राहणारे श्री. “तुकाराम क्षीरसागर” हे सायकल वरून घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा व्यवसाय करतात आज अचानक वरच्या घरात आग लागली, व धूर येऊ लागला त्यामुळे शेजारील लोक सतर्क झाले व काही मंडळींनी मा. “दिपकभाऊ मानकर” यांच्या ऑफिस मध्ये संपर्क केला, व घराला खूप मोठया प्रमाणात आग लागली आहे, ताबडतोब मदत यंत्रणा पाठवावी असे सांगितले.

सकाळची वेळ होती, क्षणाचा ही विलंब न करता मा.”दिलीपकाका कानडे” यांनी “विधुत विभाग “पोलीस यंत्रणा” व “अग्निशामक दल” यांना फोन करून तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले, पण त्यांना हे माहीत होते की संपूर्ण भाग हा वस्ती चा भाग असल्याने “अग्नीशामक दलाची” गाडी लगेच पोचू शकत नाही, म्हणून त्यांनी लगेच जवळच राहणाऱ्या “दिवा प्रतिष्ठान” चे कार्यकते व “दिपकभाऊ मानकर” मित्र परिवारातील सदस्यांना तातडीने फोन करून झालेल्या दुर्घटनेची माहिती देऊन तातडीने मदत करण्यास सांगितले, व त्याच प्रमाणे सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक महिला व लोकांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण आणत असताना शेजारील सर्व लोकांचे सर्व पाणी साठविण्यासाठी भरलेल्या टिपाडातील पाणी बादलीने रिकामे करून आग विजविण्यात यश आले, व परमेश्वराच्या कृपेने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, परंतु क्षिरसागर यांचे घर आगीत खाक झाले, घरातील सर्व वस्तू आगीत जळून खाक झाल्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज, कपाट, कपडे दारे खिडक्या आगीत जळून गेल्या, अग्नीशामक दलातील अधिकारी व पोलीस यंत्रणा वेळेवर पोहचली, परंतु अग्निशामकदल गाडी पोहोचु शकली नाही कारण वस्थी भागातील आतमधील रस्ते छोटे, असल्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही, यासाठी काहीतरी उपाय योजना भविष्यात करणे गरजेचे आहे, “स्थानिक महिला” व “पुनाराम चौधरी”, “राम वाशिवले”, “धोंडु बोडेकर”, “सागर पासलकर”, “विठ्ठल मारणे”, “सुशिल भोसले”, “हनुमंत मरगळे”, “महेश चाकणकर”, “गणेश चाकणकर”, “अनिकेत खळदकर”, “वैभव खोचडे”, “सुनील वडवेराव”, “दत्ता गायकवाड”, “अरुण भिलारे”, “शाम कोंढरे” ,”भूषण शिर्के”, यांनी मदत केली म्हणून आग आजूबाजूला पसरली नाही.⭕

Previous article🛑 भाजप नेते हरिभाऊ बागडे बँकेच्या निवणुकीत पराभूत 🛑
Next articleभोगमवाडी गावात दोन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here