• Home
  • 🛑 भाजप नेते हरिभाऊ बागडे बँकेच्या निवणुकीत पराभूत 🛑

🛑 भाजप नेते हरिभाऊ बागडे बँकेच्या निवणुकीत पराभूत 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0089.jpg

🛑 भाजप नेते हरिभाऊ बागडे बँकेच्या निवणुकीत पराभूत 🛑
✍️ औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

औरंगाबाद :⭕ माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये संचालक पदाकरिता निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर बागडे यांनी शिवसेनेचे दोन मंत्री शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचा एक आमदारांची मोट बांधुन शेतकरी विकास पॅनल उभे केले हाेते. ते पॅनेलचे सर्वेसर्वा होते. ते पराभूत झाल्याने शेतकरी विकास पॅनलच्या टीममध्ये शांततेचे वातावरण आहे.

हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद जिल्हातील मातब्बर राजकारणी म्हणून त्यांची आेळखले जातात. परंतू गेल्या पंचवीस वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर ते होते.

औरंगाबाद जिल्हामध्ये सहकारी बँक, कारखाना, दुग्ध संघाबाबतची सर्व खाचखळगे हे माहित असताना हा पराभव मात्र जिव्हारी लागणारा म्हणावा लागेल. याचे कारण एक तर शिवसेनेचे माजी खासदार आणि बागडे यांच्या मध्ये दोन दिवसांपुर्वी शाब्दिक युद्ध हे देखील काही प्रमाणात असु शकेल. शिवसेनेने हा हरिभाऊ बागडेंचा गेम केल्याची चर्चा आज दिवसभर सर्व जिल्हा बँकेच्या गोटात सुरु होती.

हरिभाऊ बागडे यांचा पराभव तसा खुपच दारुन पराभव झाला. दुसरीकडे अंबादास दानवेंसह सतिष चव्हाण देखील प्रथमच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जबरदस्त इन्ट्री केली आहे. तर दुसरीकडे सतिष चव्हाण सारखे राजकारणी जेव्हा बागडे गटाकडे जातात तेव्हा थोडेसे सावध राहून पुढचे पाऊल टाकण्याची गरज होती. तर बागडे यांनी ही निवडणुक खुप सहज घेतल्याने त्यांचा पराभव झाल्याचे काही जानकारांनी सांगितले.

मी जिल्हा बँकेच्या मतदारांचे मनापासून आभारी आहे. आणि या ही पुढे मी बँकेसाठी गरजेनुसार मदत करतच राहणार असल्याचे मत माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना व्यक्त केले. ⭕

anews Banner

Leave A Comment