Home मराठवाडा पत्रकारांची लेखणी निपक्ष असावी -राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

पत्रकारांची लेखणी निपक्ष असावी -राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

35
0

आशाताई बच्छाव

1000303301.jpg

पत्रकारांची लेखणी निपक्ष असावी -राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचा सिल्लोड शहरात प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजी नगर – पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर निपक्षपणे करावा. जेणेकरून त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल व पत्रकारांनी संघटित राहून आपल्या न्याय हक्का करिता एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दैनिक माझा मराठवाडा या वर्तमानपत्राच्या प्रथम वर्धापन दिनी
मार्गदर्शन करताना सांगितले.आज दिनांक 21 एप्रिल 24 रोजी सिल्लोड शहरातील एम टी टी सी हॉटेल हॉल येथे दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,संजय कुलकर्णी दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी , गरुड झेपचे संपादक जी टी वाघ, गजानन मरकट तरुण भारत तालुका प्रतिनिधी, दैनिक माझा मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर , दत्ता ढोरमारे ज्येष्ठ पत्रकार ,प्रवीण तायडे संपादक दैनिक माझा मराठवाडा ,जयश्री सोनवणे दैनिक माझ्या मराठवाडा ,संजय दांडगे कार्यकारी संपादक दैनिक माझ्या मराठवाडा , जमील मिर्झा दैनिक सहसंपादक दैनिक माझ्या मराठवाडा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी दैनिक माझ्या मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पत्रकार संजीव भांबोरे ,पत्रकार संजय कुलकर्णी ,पत्रकार जीटी वाघ ,पत्रकार गजानन मरकट ,पत्रकार संजय सुरडकर ,पत्रकार जयश्री सोनवणे ,पत्रकार संजय दांडगे ,पत्रकार जलील मिर्झा ,सुधाकर शिंगारे ,ज्योती राजपूत, उत्तम इंगळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पत्रकार कबीर पटेल ,पत्रकार राहुल सपकाळे पत्रकार अनिल भाले, पत्रकार योगेश शेळके, पत्रकार शेख अजीम पेंटर, पत्रकार दादाराव आपार, पत्रकार भैय्यासाहेब सुरडकर ,पत्रकार समशेर पठाण , तथागत सुरडकर चित्रकार, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे सचिव शोभा सुरडकर, समशेर पठाण सुधाकर शिंगारे ,ज्योती राजपूत ,उत्तम इंगळे ,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here