Home मराठवाडा संभाजीनगरच्या रंगमंचावर गाजली “”नजर””

संभाजीनगरच्या रंगमंचावर गाजली “”नजर””

131
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_071916.jpg

संभाजीनगरच्या रंगमंचावर गाजली “”नजर””

एस.टी.च्या 51 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धा….

भंडारा विभागातील कोमल उईके , जिजा पगाडे , हेमाक्षी डोहे , उत्कृष्ट महिला कलावंतांचा गौरव

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित 51 व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये भंडारा विभागातील नाट्यकला प्रेमींनी दोन अंकी नाट्यपुष्प संगीत नजरचे सादरीकरण केले .विभागाचे विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यंत्र अभियंता ,महेंद्र नेवारे संघ व्यवस्थापक, पराग शंभरकर कामगार अधिकारी राज्य परिवहन भंडारा ,नजर चे लेखक निर्माता दिग्दर्शक प्राध्यापक शितल दोडके सर, सह दिग्दर्शक सुरेंद्र उईके यांचे मार्गदर्शन तथा सहकार्य लाभले. आजच्या विज्ञान युगात बालिका पासून तर मोठ्या बाईपर्यंत स्त्री कितपत सुरक्षित आहे याचे जिवंत सादरीकरण म्हणजे नजर. एक मुलगी सात-आठ वर्षाची अंगणात खेळत असताना एका माणसाची नजर तिच्यावर जाते तो तिला चाकलेट आमिष दाखवून तिच्यावर क्रूरकर्म करतो तिला भावनेच्या तसेच वयाचे विचार करीत नाही असाच स्वयंघोषित बाबा लोकांना भक्तांना विश्वासात घेऊन असंख्य महिलांवर अत्याचार करतो नंतर त्याचा भंडाफोड होतो .एक महिला पत्रकार त्याचं सत्य समाजासमोर आणते .शेवटी तिला ही मारल्या जाते अशीच एक घटना कालेजात शिकणाऱ्या मुलींची. एक मुलगा तिच्याशी मैत्री करतो. ति त्याला चांगला मित्र समजायला लागते. हळूहळू तो तिला प्रपोज करतो .ती त्याला समजावून सांगते की ,मी इथे शिकायला आले .मला माझे करिअर घडवायचे आहे . माझे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे .मला माझ्या गोल सेट करायचं आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी तुला मित्र मानते .मित्रच राहा .तरी तो ऐकत नाही .त्याच्या डोक्यात वासना गंध किडे वळवळयाला लागतात .शेवटी तिच्या तोंडावर ऍसिड फेकून तिला विद्रूप करतो .अशा कितीतरी समस्या नजर ह्या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे .नजर चांगली की वाईट हे आपल्या विचारांवर अवलंबून असते .डोक्यात चांगले विचार आणले तर नजर चांगली डोक्यात वाईट विचार आणले तर नजर वाईट .मग ती नजर तिरपी व सरळ अशा वास्तव्यवादी प्रश्नांना वाचा फोडणारे नाटक म्हणजे नजर .नजर या दोन अंकी नाटकातील भूमिका करणारे कलावंत खालील प्रमाणे आहेत. बाली तथा शालेय मुलगीच्या भूमिकेत कुमारी कोमल उईके वाहतूक तिरोडा ,अंकलच्या भूमिकेत बाळकृष्ण विजाराम मलगाम चालक गोंदिया, ति च्या भूमिकेत हेमाक्षी भाऊजी डोहे वाहक गोंदिया ,स्वयंघोषित बाबाच्या भूमिकेत सुरेश विठ्ठल हलमारे चालक भंडारा, रिपोर्टर पल्लवीच्या भूमिकेत दीप लता शालिग्राम कडूकार वाहक गोंदिया, कॅमेरामॅन शैलेशच्या भूमिकेत विलास कारजी मेश्राम वाहक भंडारा ,राघव

च्या भूमिकेत प्रणव रायपूरकर चालक भंडारा ,संघर्ष च्या भूमिकेत सुखराम मल्लेवार चालक भंडारा, प्राचीच्या भूमिकेत जिजा मनोज पगारे सहाय्यक भंडारा काकाच्या भूमिकेत पुरण मंगरू पठारे वाहतूक निरीक्षक तुमसर ,चंदूच्या भूमिकेत अमोल आत्माराम गभने चालक वाहक तुमसर, हरिशच्या भूमिकेत राजेंद्र भुते चालक तथा वाहक भंडारा, पोलीस एकच्या भूमिकेत पंकज दिलीप वानखेडे यांत्रिक कर्मचारी विभागीय कार्यशाळा भंडारा ,पोलीस दोनच्या भूमिकेत सुरेश परसराम शेंडे वाहक भंडारा ,पुजारीच्या भूमिकेत सुनील गजभिये लिपिक भंडारा ,संजूच्या भूमिकेत सोहम मेश्राम वाहक भंडारा, आईच्या भूमिकेत सौभाग्य श्री अश्विन गभने सहाय्यक कारागीर भंडारा ,भक्तगण एकच्या भूमिकेत महेंद्र अशोक मोरे भंडारा, यांनी नाटकातील भूमिका पात्र रंग पंचकावर सादर केले. भंडारा विभागातील राज्य परिवहन अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी नजर नाटकातील नाट्य स्पर्धकांना अभिनंदन करून गौरव केला व पुढील स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या.

Previous articleकेंद्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम :- इंजि.प्रमोदजी पिपरे
Next articleपातुर्डा येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here