Home मराठवाडा पात्र लाभार्थी कुटूंबांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा – शितलताई पटारे

पात्र लाभार्थी कुटूंबांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा – शितलताई पटारे

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_080443.jpg

पात्र लाभार्थी कुटूंबांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा – शितलताई पटारे
भोकर येथे शिवजयंती निमीत्ताने मोफत अन्नधान्य, आनंदाचा शिधा व अन्त्योदय साडी वितरण समारंभ संपन्न
भोकर(वार्ताहर दिपक कदम) – सरकारने गरीब कुटूंबासाठी प्राधान्य कुटूंब लाभार्थी, आनंदाचा शिधा, अन्न सुरक्षा योजना, अन्त्योदय साडी योजना आदि योजना स्वस्त धान्य दुकानातून गरीबांना लाभाच्या योजनांबरोबरच ग्रामीण कारागीरांसाठी विश्वकर्मा योजना, असंघटीत कामगारांसाठीच्या योजना आदि विविध प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत. या सर्व योजना ऑनलाईन असल्यातरी त्याबाबतच्या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या योजनांचा जास्तीत जास्त कुटूंबांनी लाभ घेवून योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन भोकर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच शितलताई पटारे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील चंद्रकांत झुरंगे व विजय मैराळ या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून गरीब व पात्र लाभार्थी कुटूंबासाठी प्रभु श्रीराम जन्मोत्सव सोहळा व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमीत्ताने प्राधान्य लाभार्थी कुटूंबांना मोफत अन्नधान्य, आनंदाचा शिधा व मोफत अन्त्योदय साडी योजना वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानाहुन त्या बोलत होत्या. यावेळी ग्राम महसुलअधिकारी अशोक चितळकर, ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, उपसरपंच सागर आहेर, सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब काळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊराव सुडके, तालुका संघटक सतीष शेळके, काँग्रेस सेवा दलाचे तालुुकाध्यक्ष सुदामराव पटारे, दक्षता कमेटी सदस्य भागवतराव पटारे, सेनेचे दत्तात्रय पटारे, रीपाईचे सुरेश अमोलीक, प्रहारचे नानासाहेब तागड व राजेंद्र चौधरी, असंघटीत कामगार नेते गणेश छल्लारे, रामदास शिंदे व संचीत गिरमे आदिंसह प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी भाजपाचे तालुका संघटक सतीष शेळके व संचीत गिरमे यांनी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या गरीबांसाठीच्या व शेतकर्‍यासाठी च्या सुरू केलेल्या विविध योजनांची माहीती विषद करत असताना योजना अंमलबजावणी प्रभावीपणे राबवाव्यात आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून त्या योजना प्रत्येक लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम संबधीत यंत्रणेने तप्तरतेने करण्याचे आवाहन केले. यावेळी दक्षता कमेटी सदस्य भागवतराव पटारे, असंघटीत कामगार नेते गणेश छल्लारे व मार्गदर्शक रामदास शिंदे आदिंनी मनोगतं व्यक्त करत समाज जागृती केली. प्रस्ताविक व सुत्रसंचालन धान्य दुकानदार चंद्रकांत झुरंगे यांनी केले. यावेळी उपस्थीत मान्यवरांचे हस्ते मोफत अन्नधान्य, आनंदाचा शिधा संच व अन्त्योदय साडी वितरण करण्यात आले.
यावेळी संचीत गिरमे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, गणेश कांबळे, आण्णासाहेब शेळके, प्रताप पटारे, राहुल अभंग, नारायण पटारे, विजय झिने, गोरख डूकरे, वेणुनाथ डूकरे, विजय अमोलीक, रवींद्र लोखंडे, रावसाहेब लोखंडे, सोपान कोल्हे, दादासाहेब मैराळ, राजेंद्र विधाटे, बबन आहेर, संजय मैराळ, बापूसाहेब खेडकर, सागर अमोलीक, सोमनाथ पंडीत, मनेष शिंदे, सोपान बर्डे, सोमनाथ बर्डे, बाबुराव आबुज, प्रभाकर खेत्री,जगन्नाथ पवार, ताराबाई मैराळ, छाया दारूंटे, सुमन गायकवाड, सुनिता खेत्री, चाँदबी शेख, सुलोचना बर्डे, जनाबाई आहेर, सिंधुबाई दळवी, कमल आहेर, चंद्रकला आहेर, मार्याबाई अमोलीक, शोभा भालके, शारदा भालके, शहाबाई गायकवाड, सत्यभामा अमोलीक, निर्मला अमोलीक, निर्मला ढाले, उज्वला न्हावले, परीघा गायकवाड, मंदाबाई आहेर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व लाभार्थी कार्डधारक उपस्थीत होते. शेवटी रामदास शिंदे यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

भोकर येथील चंद्रकांत झुरंगे व विजय मैराळ या स्वस्त धान्य दुकानमध्ये मोफत अन्नधान्य, आनंदाचा शिधा व अन्त्योदय साडी वितरण समारंभ प्रसंगी सरपंच सौ, शितलताई पटारे समवेत अशोक चितळकर, प्रदिप ढुमणे, बाबासाहेब साळवे, सागर आहेर, आण्णासाहेब काळे, भाऊराव सुडके, सतीष शेळके, सुदामराव पटारे, भागवतराव पटारे, दत्तात्रय पटारे, सुरेश अमोलीक, नानासाहेब तागड व राजेंद्र चौधरी, गणेश छल्लारे, रामदास शिंदे व संचीत गिरमे आदिंसह मान्यवर व लाभार्थी दिसत आहेत.

Previous article21 फेब्रुवारी पासून बारावीची परीक्षा ; संवेदनशील 28 केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
Next articleशब्द ही पडतील अपूरे अशी शिवबाची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here