Home उतर महाराष्ट्र शब्द ही पडतील अपूरे अशी शिवबाची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या...

शब्द ही पडतील अपूरे अशी शिवबाची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_080903.jpg

श्रीरामपूर ,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी): शब्द ही पडतील अपूरे
अशी शिवबाची कीर्ती
राजा शोभून दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती
शिवरायांची महती ती काय वर्णावी रयतेचे राज्य निर्माण करतांना सर्वच घटकांना समाविष्ट करून जगासमोर आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन अध्यापिका वर्षा गायकवाड मॅडम यांनी शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
जि.प.प्रा.शाळा पुजारीवस्ती येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेच्या समोर अप्रतिम सडा रांगोळी करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस शाळेच्या अध्यापिका श्रीमती वर्षा गायकवाड मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.चि.ओम ओहोळ चि.विशाल महाडीक यांनी गीत गायन सादर केले. कु.मृणाली क्षिरसागर हिने संपूर्ण शिवगर्जना तोंडपाठ म्हटली तर ईश्वरी शिखरे हिने तलवारीबाजीचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांनां मंत्रमुग्ध केले. सर्वांनी दोघींचे विशेष कौतुक केले.
वाचन प्रतिज्ञा व घोषवाक्य लेखन घेण्यात आले यावेळी उपस्थित सर्व महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमप्रसंगी श्री.देवेंद्र शिखरे यांच्या अध्यक्षतेखालील पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी योगेश ओहोळ,गौतम बर्डे,प्रकाश जोशी,जालिंदर महाडीक काका,रामदास थोरात तसेच सौ. वैशाली हुरे,सौ.शितल जोशी,सौ.कविता जोशी,सौ.वैशाली, जोशी,सौ.मनिषा क्षिरसागर,सौ.रोहिणी जोशी,सौ.पुजारी मावशी,सौ.जयश्री बर्डे सौ.आरती शिखरे,सौ.प्रियंका थोरात,कु.मोनाली पुजारी ,कु.साक्षी पुजारी यांच्या प्रमुख उपस्थिती बरोबरच माजी विद्यार्थी व ग्रामस्थही उपस्थित होते.शेवटी महिलांच्या संगीत खुर्ची या मनोरंजक खेळाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन वर्षा गायकवाड मॅडम यांनी केले तर आभार सौ.मनिषा क्षीरसागर यांनी मानले.

Previous articleपात्र लाभार्थी कुटूंबांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा – शितलताई पटारे
Next articleसंगमनेर येथे संत इग्नाती चर्च मध्ये १४४ वा ख्रिस्ती वधू वर परिचय मेळावा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here