Home बुलढाणा मोटरसायकल चोरी करणा-या आरोपीचे तामगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या!

मोटरसायकल चोरी करणा-या आरोपीचे तामगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या!

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_060430.jpg

मोटरसायकल चोरी करणा-या आरोपीचे तामगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
नव्याने रुजू झालेले तामगाव पोस्टे चे ठाणेदार पवार कडून कारवाईचा सपाटा सुरू.. ब्युरो चीफ बुलढाणा ज्ञानेश्वर पाटील दांदळे संग्रामपूर – तामगाव पोस्टेला अप नं 389/2023 कलम 379 भादंवि तसेच अप.क्र. 04/2024 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन दोन्ही गुन्हयातील मो.सा. चोरी झालेले असुन त्यामध्ये आरोपी नामे दत्तात्रय मनोहर वेरुळकार रा. धामणगांव गोतमारे ता. संग्रामपूर असुन त्याचा सुगावा करुन तो मिळुन आल्याने त्याला पोस्टे अप नं. 389/23 कलम 379 भादंवि मध्ये अटक केले व मा. न्यायालय प्रथम वर्ग संग्रामपुर येथे पेश केले असता नमुद आरोपी याचा दि.06/02/2024 रोजी पावेतो पीसीआर मिळाल्याने त्यास सदर गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता गोपाळ श्रीकृष्ण राउत रा.सगोडा यांची असलेली हिरो एच एफ डिलक्स काळया रंगाची लाल पांढरा पटटा असलेली MH 28 BL 9407 किं 40,000 रु.ची ही मोटर सायकल अटकेतील आरोपीने अमोल जीवनसींग सोळंके रा-निवाणा यांचे सांगण्यावरुन चोरुन नेवुन त्याला दिली असे सांगीतल्यावरुन आरोपी अमोल जीवनसींग सोळंके यास सदर गुन्हयात अटक करुन त्याचे कडुन सदर मो.सा ही जप्त करण्यात आली. तसेच अटकेतील आरोपी दत्तात्रय वेरुळकार रा. धामणगांव गोतमारे ता.संग्रामपूर यांने. संजय श्रावण मोहे रा. निवाणा यांची बजाज प्लसर मो सा क्र.MH-28 BH 2077 ही चोरुन नेवुन ती अंजनगांव सुर्जी बस स्टॅन्ड वर लावलेली सदर मो.सा.ही अंजनगांव सुर्जी येथे जावुन आरोपी कडुन जप्त करण्यात आली आहे.

पो.स्टे. तामगांव येथे अप.क्र.389/2023 कलम 379 भादंवि तसेच अप.क्र. 04/2024 कलम 379 भादंवि प्रमाणे दाखल असुन नमुद दोन्ही गुन्हयात आरोपी दत्तात्रय मनोहर वेरुळकार रा. धामणगांव गोतमारे ता. संग्रामपूर व आरोपी अमोल जीवनींग सोळंके रा-निवाणा याचे कडुन चोरी गेलेले दोन्ही मो.सा. किंमत 1 लाख 40 हजार रु.च्या मो.सा. जप्त करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब, अशोक थोरात अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, देवमण गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेंद्र पवार ठाणेदार पोस्टे तामगांव, ए.एस.आय रामकिसन माळी बं. नं 1558, पो.ना. संतोष गाडे ब नं 207, पोका मनिष वानखडे ब नं 2645, चालक पोहेकाॕ संतोष आखरे ब नं 550 यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here