Home वाशिम मानवाने सर्व सजीवांप्रती करुणाभाव जोपासावा – लामा कुंगा रिचेंन

मानवाने सर्व सजीवांप्रती करुणाभाव जोपासावा – लामा कुंगा रिचेंन

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_060858.jpg

मानवाने सर्व सजीवांप्रती करुणाभाव जोपासावा – लामा कुंगा रिचेंन
अडोळी येथे ‘बौध्द धर्मशास्त्राचे सार’ धम्मदेशना मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- करुणा आणि दयाभाव हा मानवाचा स्थायीभाव आहे. त्यानुसार मानवाने या भुतलावरील सर्व सजीव जिवांप्रती करुणाभाव जोपासून त्यांचे रक्षण करावे असे उपदेशपर प्रतिपादन ४३ वे परमपावन शाक्य त्रिझीन कार्यालय डेहराडून उत्तराखंडचे जनसंपर्क प्रमुख लामा कुंगा रिचेंन यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले.
तिबेटीयन शाक्य परंपरेची महाराष्ट्राला ओळख व त्यांच्यासोबत बौध्द धम्म वृध्दींगत करण्यासाठी आणी बौध्द परंपरेचे पालन करण्यासाठी परमपावन ४१ वे शाक्य त्रिझीन यांच्या सुचनेनुसार येथून जवळच असलेल्या ग्राम अडोळी येथे शनिवार, ३ फेब्रुवारीला बुद्धसासन फाऊंडेशन व अमिताभा बुद्धीस्ट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ‘बौध्द धर्मशास्त्राचे सार’ हा धम्मदेशना मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला जि.प. सदस्य दिलीपराव देशमुख, वंचित बहूजन आघाडीचे सचिव वसंत हिवराळे, बाजार समिती संचालक विनोद पट्टेबहादूर, सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अध्यक्ष परमेश्वर अंभोरे, डॉ. चंद्रशेखर, सरपंच सौ. सविता इढोळे, माजी सरपंच ना.द. इढोळे, इंजि. बळीराम इढोळे, माजी प्राचार्य आत्माराम पडघान, अमिताभा बुद्धीष्ट सोसायटीचे अध्यक्ष अमर माने, निवृत्ती सरकटे उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना लामा कुंगा रिचेंन पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात शाक्य परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महासत्व विरोपा रत्नागिरी, कोकण, काले लेण्यांमध्ये वास्तव्यास होते. तेथे त्यांनी तिबेटीयन शाक्य परंपरा सुरु केली होती. म्हणून तिबेटीयन शाक्य परंपरा आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. मानवाला सत्कर्मामुळे मानव जन्म लाभला असून त्यामुळे मानवाने जीवनात सतत सत्कर्म करत राहावे व सर्व सजीव जिवांप्रती करुणाभाव जोपासावा. लवकरच परमपावन ४३ वे शाक्य ट्रिझिन हे अडोळीला येवून आपणा सर्वांना उपदेश करतील असे त्यांनी शेवटी सांगीतले.
दरम्यान धम्मदर्शी एन.के. सावळे यांनी बुद्धधम्म दर्शन फोटोचा संच फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज पडघान यांना दिला. कार्यक्रमात प्रा. सु.ना. खंडारे, दौलतराव हिवराळे, प्रविण पट्टेबहादूर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर पडघान, अशोक खंडारे, रमेश पडघान, गजानन पडघान, संदीप पडघान, संतोष पडघान, राहुल पाईकराव, विठ्ठल पडघान, शरद खंडारे, मदन पडघान, हरिष पडघान, प्रशांत पडघान आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. प्रमोद पट्टेबहादूर तर आभार बुद्धसासन फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज पडघान यांनी मानले.

Previous articleमोटरसायकल चोरी करणा-या आरोपीचे तामगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
Next articleसंवाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here