• Home
  • मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान, व रक्तदान शिबीर, उत्साहात संपन्न..

मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान, व रक्तदान शिबीर, उत्साहात संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210220-WA0060.jpg

मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त
व्याख्यान, व रक्तदान शिबीर, उत्साहात संपन्न..
७५ बाटल्या रक्तसंकन करण्यात आले.,…….
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड-   रयतेचे राजे, कुलवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शासनाच्या आदेशाचे पालन करुन प्रबोधनात्मक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजन्मोत्सवा निमित्त शिवस्मारक येथे शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता शिवस्मारक येथे ध्वजारोहन नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रतिमापुजन सदाशिवराव पाटील जाधव व लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलिस निरिक्षक विलास गोबाडे,  कृउपबा सभापती खुषालराव पाटील उमरधरीकर, आरपिआय जिल्हा अध्यक्ष गौतम काळे, शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी कबनुरकर, व्ययंकट लोहबंदे, प्रहार तालुका अध्यक्ष शंकर वड्डेवार, शिवराज पाटील जाधव, रियाज शेख, सुरेश पाटील बेळीकर, शिवाजी राठोड, अनील जाजु, विनोद आडेपवार, आनंद पाटिल बेेेळीकर, ज्ञानेश्वर डुुुुमणे, संतोष बंसोडे, बबलु मुल्ला, तर १२ वाजता शिवस्मारक परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी समाज सेवकांच्या हस्ते वृक्ष रोपन करण्यात आले. तसेच दुपारी १:०० वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन शिवाजी गेडेवाड यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा भूषण डाॅ.दिलीपराव पुंडे हे होते. यावेळी शिव प्रेमींनी: ७५ बाटल्या रक्तसंकन करण्यात आले होते, कलम १४४ लागु असल्याणे पालखी मिरवणूक कढण्यात आले नाही. कार्यक्रमा साठी शिवजन्मोत्सव चे अध्यक्ष अदनान पाशा तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या नंतर खूप पुढील कार्यक्रम शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील प्रसिध्द साहित्यिक, कवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर, उद्घाटक माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव पा.बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजिय सर्व सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमास शासनाच्या नियमांचे पालन करुन सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment