Home Breaking News कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन

कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन

98
0

🛑 झुंज अखेर अपयशी!🛑
कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे १० जून :⭕ ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मुकुंद केणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुकुंद केणी हे ठाण्यातील गरजू लोकांना मदत करत होते. याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली. 27 मे रोजी ही बाब निदर्शनास आली. तेव्हापासून त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

9 जून रोजी रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली.
त्यामुळे उपचारादरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुंद केणी यांच्या निधनामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.⭕

Previous article५ रुपयांच्या पारले पुड्याने जगवली लाखो मजुरांचे कुटुंब
Next articleराज्यात कोरोना रुग्णसंख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडला!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here