Home नांदेड मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत सुविधेसह नागरिकांच्या सेवेसाठी चालु करा –...

मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत सुविधेसह नागरिकांच्या सेवेसाठी चालु करा – श्रीकांत काळे बेन्नाळकर

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20230123-WA0059.jpg

मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत सुविधेसह नागरिकांच्या सेवेसाठी चालु करा – श्रीकांत काळे बेन्नाळकर

मुखेड प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद शहरातील गेल्या कित्येक महिन्यांपासून करोडो रुपये शासनाने खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत सुसज्ज अशी उभी झाली पण या प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधेसह कर्मचाऱ्यांची वाणवा नेहमीच असते..
मुक्रमाबाद हे जिल्ह्याचे शेवटचे टोक असून कर्नाटक व तेलंगाना सीमेलगत असलेले मोठे शहर असून या ठिकाणी मुखेड तालुक्यातील व सीमेलगत असलेले कर्नाटक व तेलंगाना राज्यातील जवळपास ६०ते ७० गावांचा या ठिकाणाहून व्यवहार शिक्षण यासह दैनंदिन व्यवहारांची रेलचेल चालते, यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चालु करावे यासाठी श्रीकांत काळे (सामाजिक कार्यकर्ते), मन्मथ खंकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख, अतुल सुनेवाड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख, पत्रकार दत्ता पाटील माळेगावे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
शहराची लोकसंख्या जवळपास २० ते २५ हजाराच्या आसपास आहे. या मुक्रमाबाद परिसरातील जवळपास ६० ते ७० गावांचा व्यवहार पाहता नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित असलेले पूर्वीचे नागरी दवाखान्याचे आरोग्य सेवा अपुरी पडत असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने २०१५ इसवी सन मध्ये येथील नागरिकांच्या आरोग्य अबाधित राहावे या वृद्धांत हेतूसाठी मुक्रमाबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजूर करून प्रत्यक्ष इमारतीच्या कामाला सुरुवात केली. आज तगायत इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पण या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत शासनाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदांची नियुक्ती केली पण या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नसतो व तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्यात आलेल्या नाही. व तसेच नागरिकांना हवे असणाऱ्या आरोग्य सुविधा अद्याप पर्यंत मिळालेल्या नाही यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी थेटर ची व्यवस्था नाही, रुग्णांना राहण्याची सोय नाही, महिलांना प्रसूतीसाठी प्रसूती ग्रह उपलब्ध नाही, प्रसुती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. अपघात, सर्पदंश, विशबादा यासह आपत्कालीन रुग्णांना औषधोपचार करण्यासाठी कसलीच सोय नसल्यामुळे मुक्रमाबाद परिसरातील ५० ते ६० गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आले आहे.

या भागातील लोकप्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी येत्या तीन तारखेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात अध्यायावत सुविधा उपलब्ध करून सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासावे. अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल.
-मन्मथ खंकरे,
(शिवसेना उपतालुकाप्रमुख, मुखेड)

मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. याठिकाणी Anm,gnm,lhb हे कर्मचारी नसल्यामुळे महिलांना प्रसुती साठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महिलांना देगलुर किंवा उदगीर या ठिकाणी प्रस्तुतीसाठी जावावे लागत आहे.
श्रीकांत काळे, बेन्नाळकर
सामाजिक कार्यकर्ते

Previous articleचिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन
Next articleमुक्रमाबाद शहरात विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here