• Home
  • *वडगांव नगरीचे भाग्यविधाते* *कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

*वडगांव नगरीचे भाग्यविधाते* *कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

*वडगांव नगरीचे भाग्यविधाते*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहाराचे भाग्यविधाते कै.रौप्यमोहत्सवी नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह बळवंतराव यादव. यांची आज जयंती साजरी होत आहे. सलग 25 वर्षे नगराध्यक्ष पदी असण्याचा मान मिळवणारे थोर नेते.
अवघ्या 25 व्या वर्षी ,50 व्या,75 व्या वर्षी सुद्धा वडगांव नगरीने नगराध्यक्ष पदी निवडून दिले. गोरगरीब जनतेचा कैवारी असे हे थोर नेते. साहेबांनी वडगांव वआसपासच्या गावातील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून 1968 साली शैक्षणिक संस्था स्थापन करून अवघ्या 4 विध्यार्थी पासुन सुरू केलेली शाळा आज 2500 ते 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ,(शाळा काँलेज, इंग्लिश स्कुल ,इंटनँशनल स्कुल च्या माध्यमातून ) पत संस्थेच्या माध्यमातून ,नगरपालिकेच्या माध्यमातून हजारो तरूणांना रोजगार निर्माण करून देणारे. आज या वडगांव नगरीला साहेबांची उणीव भासत आहे. या वडगांव नगरीने साहेबांना भरभरून प्रेम दिले.ऐसा नेता होणे नाही.
यादव साहेबांच्या जयंती
निमित्ताने दर वर्षी मुकबधिर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय साहीत्य वाटप, महारक्तदान शिबीर , महाआरोग्य शिबीराचा लाभ हजारो गोरगरीब जनतेला मिळत होता.
पण या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment