• Home
  • कोरोना निगेटीव्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करा ; आस्तिक कुमार पांडेय –

कोरोना निगेटीव्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करा ; आस्तिक कुमार पांडेय –

कोरोना निगेटीव्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करा ; आस्तिक कुमार पांडेय –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. १८ – औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आणि आयुक्त मा. आस्तिक कुमार पांडेय यांनी आज व्यापारी महासंघ, भाजी विक्रेते संघटना, फळ विक्रेते संघटना, दूध विक्रेते संघटना, किराणा दुकान मालक संघटना, चिकन-मटन विक्रेते संघटना, दूध आणि अंडी विक्रेता संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसमवेत रविवार पासून उघडणाऱ्या लॉकडाऊन बाबत चर्चा करून खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
1) उद्या दि 18 जुलै दुपारी दोन वाजेपासून औरंगाबाद महानगरपालिका तर्फे सर्व किराणा दुकान चालक, भाजीपाला विक्रेते, दूध, चिकन-मटन, अंडी विक्रेत्यांची कोरोना अँटीजन चाचण्या करण्यात येतील.
2) चाचण्यांचे ठिकाण वर नमूद संघटनांनी नेमून दिलेले स्पॉटसवर शिबीर लावून चाचण्या करण्यात येईल.
3) जे विक्रेते अँटीजन चाचणीत कोरोना निगेटिव्ह येतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि रविवार पासून फक्त निगेटिव्ह प्रमाण पत्र धारकांना साहित्य विक्रीची मुभा राहील.
4) या आदेशाची यशस्वी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी साठी महानगरपालिके तर्फे 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. सदरील कर्मचारी वर नमूद प्रत्येक विक्रेत्या कडे कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाण पत्राची चाचणी करतील. जर कोणत्या विक्रेत्याकडे प्रमाण पत्र आढळून आले नाही तर त्यांच्या कडून दंड आकारणी करण्यात येईल आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल.
5) सदरील आदेश पुढच्या सात दिवसांपर्यंत अमलात राहील.
6) जाधव मंडी येथील तपासणी करण्यासाठी दोन पथक नेमण्यात येईल.
7) दुसऱ्या टप्प्यात अन्य आस्थापना जिथे लोकांची गर्दी कमी होते उदाहरणार्थ मेडिकल, गैरेज, पमचर व इतर आस्थापना यांची कोविड चाचण्या करण्यात येईल.
श्री पांडेय यांनी औरंगाबादच्या जनतेस निवेदन केले आहे की आपले आणि आपल्या परिवाराचे आरोग्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. नागरिकांनी फक्त कोरोना निगेटिव्ह असलेले विक्रेत्यांकडूनच सामान खरेदी करावे आणि औरंगाबाद महानगरपालिकेला सहकार्य करावे.

anews Banner

Leave A Comment