• Home
  • नांदेड जिल्हा अंतर्गत बँक व्यवहारा बाबत संचारबंदीचे सुधारित आदेश – नांदेड, दि. १८

नांदेड जिल्हा अंतर्गत बँक व्यवहारा बाबत संचारबंदीचे सुधारित आदेश – नांदेड, दि. १८

नांदेड जिल्हा अंतर्गत बँक व्यवहारा बाबत संचारबंदीचे सुधारित आदेश –
नांदेड, दि. १८ ; राजेश एन भांगे

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संचारबंदीबाबत आज सुधारित आदेश निर्गमीत केले आहेत. या सुधारित आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली बँकेची ठोक व्यवहार (Bulk transation for essential servies) चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
यापुर्वीच्या आदेशात नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील त्याव्यतिरिक्त बॅकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणतेही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहिल असे निर्देश दिले होते.

anews Banner

Leave A Comment