• Home
  • एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

प्रतिनिधी=किरण अहिरराव

मुंबई : कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला.

एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे.

सरकार एकीकडे नोकरीवरुन काढू नका म्हणत असताना एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे
2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.

जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ज्यांचं प्रशिक्षण सुरु आहे, त्या कर्मचाऱ्यांचंही प्रशिक्षण थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे.
एसटीच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी.
भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे
चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, ते सुद्धा थांबवावे

anews Banner

कोल्हापूरच्या आमदारांनी गृहमंत्र्यांशी घेतली आढावा बैठक. कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील यांचे पुतणे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार ॠतूराज पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर प्रश्न मांडले. १) कोल्हापुरात लवकरात लवकर आयुक्तालय व्हावे? मा. गृहमंत्री अनिल देशमुख : कोरोना महामारीनंतर कोल्हापुरात आयुक्तालयाच्या मागणीबाबत शासन सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईल. २) सध्या दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 आहे. ती लोकांना गैरसोयीची आहे. ही वेळ बदलून सकाळी 9 ते सायंकाळी 7 करण्यात यावी? मा. गृहमंत्री अनिल देशमुख : दुकानांच्या वेळेबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने लोकांची सोय लक्षात घेऊन यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. अशा पद्धतीने मा.आमदार ॠतूराज पाटील जनतेच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांनी आ.पाटील यांना समाधानकारक उत्तरे् दिली. कोल्हापुर प्रतिनिधी. मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.

By Yuva Maratha

Leave A Comment