Home नांदेड मुक्रमाबाद शहरात विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

मुक्रमाबाद शहरात विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

147

आशाताई बच्छाव

IMG-20230123-WA0093.jpg

मुक्रमाबाद शहरात विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
मुक्रमाबाद प्रतिनिधी
हिंदुह्रदयसम्राट शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मुक्रमाबाद येथील मुख्य बसस्थानकावर व ठाकरे स्मृती स्थळ इटग्याळ प.मु. येथे साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मन्मथ खंकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला..
तद्नंतर मुख्य बस स्थानक खंकरे कॉम्प्लेक्स समोर हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शिवसैनिक संजय गायकवाड यांनी इटग्याळ प.मु येथे स्वर्चाने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ येथे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेना उपतालुकाप्रमुख मन्मथ खंकरे, बबन बडगणे, अतुल सुनेवाड, सुरेश औरादे, राहुल निलेवाड, सुनील बेल्लेवार, नागनाथ जळकोटे, सदानंद घाळे, बसुअप्पा मठपती, ज्ञानोबा देवकत्ते, अनिल इंगळे, विरेश इंदुरे, गुंडेराव सादगिरे, अनेक शिवसैनिक व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत सुविधेसह नागरिकांच्या सेवेसाठी चालु करा – श्रीकांत काळे बेन्नाळकर
Next articleनवी धा़द्री प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.