Home नांदेड लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

122

आशाताई बच्छाव

1000346048.jpg

लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
मराठवाडा विभागीय संपादक
मनोज बिरादार
नांदेड  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्रक्रियेदरम्‍यान नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा विधानसभा मतदार संघामध्‍ये 7 मे रोजी ज्‍याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्‍याठिकाणा पासून 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

पक्षकारांना मंडपे उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास व मोबाईल, कॉडलेसफोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे प्रदर्शन करण्‍यास तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास याद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध करण्‍यात आले आहे.

नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा या विधानसभा मतदार संघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 2024 करीता हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्‍हणुन दिनाक 7 मे 2024 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान संपेपर्यंत अंमलात राहील.