Home बीड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा!

134

आशाताई बच्छाव

1000346046.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/अंबेजोगाई– बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मंगळवार दिनांक ०७ मे २०२४ रोजी अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. याकरिता वाहतुकीची कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून नेहमीच्या मार्गात बदल करण्यात आला असून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. वाहन चालक आणि पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतुकीची कोंडी टाळावी असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक सभेकरिता अंबेजोगाई येथे मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते वाहनांसह उपस्थित राहणार आहेत. तसेच जनता ही मोठ्या संख्येने वाहनातून येणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन जनतेच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होऊ नये. नागरिकांच्या वाहतुकीच्या वाहनांची गैरसोय होऊ नये. वाहतुकीच्या कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याकरिता अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून खालील प्रमाणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतूक वळविण्यात आलेले पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. बीड – केज – लोखंडी सावरगाव टी पॉईंट पाण्याची टाकी यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई – परळी या मार्गाची वाहतूक १) लोखंडी सावरगाव टी पॉईंट वाघाळा साखर कारखाना वाघाळा रोड, बायपास अंबाजोगाई भगवानबाबा चौक – परळी.२) लोखंडी सावरगाव टी पॉईंट वाघाळा साखर कारखाना सेलू रोड – तथागत चौक – भगवानबाबा चौक – परळी.३) लोखंडी सावरगाव टी पॉईंट वाघाळा साखर कारखाना – पोखरी रोड, तथागत चौक – भगवानबाबा चौक – परळी अशी वळविण्यात आली आहे. परळी – अंबाजोगाई – यशवंतराव चव्हाण चौक – लोखंडी सावरगाव – केज – बीड या मार्गावरील वाहतूक भगवानबाबा चौक – तथागत चौक – पोखरी रोड – वाघळा कारखाना – लोखंडी सावरगाव – केज – बीड या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. लातूर – अंबाजोगाई – परळी या मार्गावरील वाहतूक लातूर – पोखरी तथागत चौक – अंबाजोगाई – भगवानबाबा चौक – अंबेजोगाई अशी वळविण्यात आली आहे. परळी – अंबाजोगाई – लातूर या मार्गावरील वाहतूक भगवानबाबा चौक -अंबेजोगाई – तथागत चौक – पोखरी -लातूर या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. तरी कृषी महाविद्यालय, बीड रोड, अंबाजोगाई येथे सभा मार्गावरील वाहतुक (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, ॲम्बुलन्स, अग्निशामन दलाची वाहने वगळता) ही दिनांक ०७ मे २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजेपासून ते १८:०० सभा संपुन वाहतूक सुरळीत होईपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक वरील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी सर्व वाहन चालक व मालकांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आदेश बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत.

Previous articleदैनिक माहाभूमीच्या प्रतिनिधींची माहोरा येथे बैठक संपन्न
Next articleलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.