आशाताई बच्छाव
परळी नगरपरिषदेवर आगामी निवडणुकीत भगवा फडकवा – अशोक पटवर्धन
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.26/10/2025 आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने परळी येथे शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेकडो शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी मिळून नगरपरिषदेवर भगवा फडकवावा मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहेत. असे आव्हान शिवसेनेचे विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांनी केले.
नुकतेच नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आणि सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले. शिवसेनेने आपली बांधणी करत परळी शहरातील सर्वच प्रभागात आपल्या उमेदवारांची चाचपणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. काल दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने यांच्यावतीने आयोजित शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेची बैठक संपन्न झाली यावेळी अनेक उमेदवारांनी पक्षाकडे आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला. शिवसेनेचे विभागीय सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्वप्नील गलधर, युवा सेना जिल्हाप्रमुख रविराज बडे, योगेश नवले यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली.
या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत युती बाबतच्या भावना व्यक्त केल्या. नगरपरिषदेवरील मागील काळातील अनेक गोष्टींना उजाळा दिला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आपले परखड मत मांडले शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे निर्णय देतील त्याचे पालन शिवसैनिक करतील असा विश्वास त्यांनी दिला. शिवसैनिकांची या बैठकीस लक्षणीय उपस्थिती होती या बैठकीचे प्रास्ताविक युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष चौधरी यांनी केले तर संचलन सुदर्शन यादव यांनी केले.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने, अल्पसंख्यांक प्रवक्ते नशीब शेख, तालुका सचिव विशाल राठोड, युवा सेना तालुकाप्रमुख बाबा सोनवणे, शहर प्रमुख रुपेश गायकवाड, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, किशन बुंदेले, संजय गावडे, सचिन सोनवणे, कृष्णा सुरवसे, संपत शिंदे, उमेश सोळंके, सागर बुंदेले, यांनी परिश्रम घेतले यावेळी शहरातील विविध प्रभागातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.






