• Home
  • 🛑 “विजयादशमी निमित्ताने अर्थातच “दसरा” दिवशी मनसे तर्फे अन्नदान,श्रेष्ठदान 🛑

🛑 “विजयादशमी निमित्ताने अर्थातच “दसरा” दिवशी मनसे तर्फे अन्नदान,श्रेष्ठदान 🛑

🛑 “विजयादशमी निमित्ताने अर्थातच “दसरा” दिवशी मनसे तर्फे अन्नदान,श्रेष्ठदान 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕याच दिवशी प्रभू #श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध‌केला होता आणि देवी #दुर्गामातेने रात्रंदिवस युद्ध करीत महिषासुरावर विजय प्राप्त केला होता.*
असत्यावर सत्याचा विजय झाला होता.

पूर्वीच्या काळी प्रभू श्रीरामचंद्र यांना आपले वडील राजा दशरथ यांच्या आज्ञेनुसार चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता. परंतु सध्याच्या आधुनिक युगात काही माता-पित्यांना उतरत्या वयात कौटुंबिक आधाराची गरज असून देखील आपल्या मुलांच्या आज्ञेनुसार वनवासात अर्थातच वृद्धाश्रमात जाव लागतं.
कर्वेनगर मधील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये अनेक वृद्ध आजी आजोबा यांची उत्तम देखभाल घेतली जाते.

विजयादशमी चे औचित्य साधून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड च्या वतीने या आजी-आजोबांची सेवा घडावी या हेतूने पौष्टिक अन्नपदार्थांचे वाटप केले. त्यामध्ये खजूर लाडू,शेंगदाणा लाडू आणि राजगिरा गुलकंद वडी याचे वाटप केले. याप्रसंगी

महाराष्ट्र_नवनिर्माण_सेनेचे जनहित कक्षाचे महाराष्ट्राचे सचिव तथा कोथरूड उपविभाग अध्यक्ष -संजय_काळे यांच्यासमवेत विकास जाधव,राजाभाऊ बलकवडे,तुषार कंधारे,पोपट बोत्रे,प्रफुल्ल कुडले, कुणाल काटवे,छत्रपती पुरस्कार विजेते गणेश सातपुते,दीपक कुल,नाना गायकवाड,श्याम सुर्वे आदि #महाराष्ट्र_सैनिक उपस्थित होते.

यावेळी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक रमेश देवकुळे आणि शेवाळे मावशी याच बरोबर कळतं नकळत ज्यांचे सहकार्य लाभले अशा सर्वांचे मनापासून आभार….⭕

anews Banner

Leave A Comment