• Home
  • 🛑 राज्य सरकारवर विश्वास….! पण दगा फटका केल्यास सोडणार नाही :- संभाजी राजे 🛑

🛑 राज्य सरकारवर विश्वास….! पण दगा फटका केल्यास सोडणार नाही :- संभाजी राजे 🛑

🛑 राज्य सरकारवर विश्वास….! पण दगा फटका केल्यास सोडणार नाही :- संभाजी राजे 🛑
✍️जालना 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जालना :⭕ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली. जालना येथे राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेत छत्रपती संभाजी राजे बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.

ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.

दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा आहे. मात्र पानीपत होऊ द्यायचा नाही, असा सल्ला देखील संभाजी राजे यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला.

आपला राज्य सरकारच्या समितीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, दगाफटका केल्यास सोडणार नाही, असा सज्जड इशारा देखील संभाजी राजे यांनी सरकारला दिला.

खासदार संभाजी राजे छत्रपती म्हणाले, आरक्षण मला नको तर 85 टक्के गरीब मराठ्यांना हवं आहे. शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. 200 वर्षांनंतर छत्रपती शाहू महाराजांनी देखील वंचितांना आरक्षण दिलं. मग आता मराठा समाज बहुजनातून बाहेर का? वंचितांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही.

मात्र मराठा समाज मागासलेला सिद्ध होऊन देखील त्यांच्या आरक्षणाला विरोध का? आता फक्त एकच लक्ष्य ठेवायचा तो म्हणजे हक्काचा SEBC आरक्षण टिकविणे, असं संभाजी राजे यांनी सांगितलं….⭕

anews Banner

Leave A Comment