Home Breaking News मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

94
0

मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

औरंगाबाद, दि. २७ – मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. त्यानुसार या सुविधांचा विकास करण्यावर भर आहे. अति पावसामुळे अनेक रस्ते, पूल यांची दुरावस्था झालेली आहे. त्यांच्या दुरूस्तीकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पळशी- अंजनडोह आणि हर्सुल-जटवाडा क्षतीग्रस्त रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी मंत्री श्री.चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, कल्याण काळे, विलास औताडे, सुभाष झांबड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, उपअभियंता एस.जी. केंद्रे, शाखा अभियंता डी.एस.कांबळे आदींची उपस्थिती होती.

सुरूवातीला पळशी येथे ग्रामस्थांनी श्री.चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पळशीतील बेबीताई राठोड यांच्या शेतातील कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी श्री.चव्हाण यांनी केली. पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत शासनाने मदत जाहीर केलेली आहे, ती नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याला मिळेल, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. यानंतर चव्हाण यांनी शामवाडी येथेही भेट दिली. तसेच हर्सुल- जटवाडा क्षतीग्रस्त रोडची देखील पाहणी करून या रस्त्यांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना यावेळी चव्हाण यांनी केल्या.

Previous article🛑 राज्य सरकारवर विश्वास….! पण दगा फटका केल्यास सोडणार नाही :- संभाजी राजे 🛑
Next articleप्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here