Home Breaking News महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व...

महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूरस्थितीची केली पाहणी –

95
0

महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूरस्थितीची केली पाहणी –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

इचलकरंजी – दि. ८ –
२०१९ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेत, महापूरा साठीच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील प्रमुख मंत्री यांच्यामध्ये ८ जुलै २०२० रोजी मुंबई येथे बैठक संपन्न झाली होती, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी व दोन्ही राज्यांमधील पाटबंधारे विभागाचे अधिकारी व प्रमुख उच्चस्तरीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा आढावा व संभाव्य महापुराबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चे नियोजन निश्चित केले होते, मागील चार दिवस झाले महाराष्ट्राच्या प्रमुख धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोल्हापूर सांगली भागात महापूराची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे, यामुळे शनिवारी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शनिवारी दि.८ आॕगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे एकत्र येऊन पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत सद्यस्थितीची माहिती घेतली, पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक मधील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बोरगांव येथे आढावा बैठक घेतली, दोन्ही राज्याकडून सध्या समन्वय राखला जात आहे, यापुढे तो कायम ठेवावा असे उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्री जारकीहोळी व महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आदेश दिले, पुढील काळासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या,सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून १.५६००० क्यूसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कर्नाटक मधील आलमट्टी या प्रमुख धरणांमधून २.२०००० क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती आढावा बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली,
महापुरामुळे दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना मंत्री जारकीहोळी व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या,.
यावेळी चिक्कोडी मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्किरे, बेळगाव चे जिल्हाधिकारी आर.जे.हिरेमठ, बेळगाव चे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, प्रांताधिकारी रविंद्र करलींग, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील, चिकोडी चे तहसीलदार एस. संपगावी, यांच्यासह प्रांताधिकारी विकास खरात शिरोळ च्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील, नायब तहसीलदार सनदी मॅडम, बोरगावचे उत्तम पाटील, अभिनंदन पाटील संजय नांदणे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleसार्वजनिक बांधकाम विभाग एकाच दिवसात ६३ अभियंत्यांच्या बदल्या –
Next articleएम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत तिस-या आठवड्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here