• Home
  • सार्वजनिक बांधकाम विभाग एकाच दिवसात ६३ अभियंत्यांच्या बदल्या –

सार्वजनिक बांधकाम विभाग एकाच दिवसात ६३ अभियंत्यांच्या बदल्या –

सार्वजनिक बांधकाम विभाग एकाच दिवसात ६३ अभियंत्यांच्या बदल्या –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. ८ – राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल 63 अभियत्यांच्या शुक्रवारी एका दिवसात बदल्या झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात अलिकडच्या दिवसात एका दिवसात एका विभागातील अधिका-यांच्या मोठया संख्येने बदल्या होण्याची बहुदा पहिली घटना आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे एप्रिल व मे महिन्यात सरकारी अधिकारी व कर्मचा-यांच्या नियमित बदल्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 15 टक्क्यांच्या मर्यादेत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आली होती. 31 जुलैपर्यंत या बदल्या करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर बदल्यांसाठी 10 आँगस्ट अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. सामान्य् प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय(जीआर) जारी केला होता.

या जीआरच्या अनुशंगाने सार्वजनिक बांधकाम विभागातील 63 अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता या दर्जाच्या अधिका-यांचा समावेश असल्याचे समजते.

anews Banner

Leave A Comment