Home पुणे अब की बार भाजपा 100 पार मध्ये दापोडीत कमळ फुलणारच – अमोल...

अब की बार भाजपा 100 पार मध्ये दापोडीत कमळ फुलणारच – अमोल थोरात….

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0017.jpg

अब की बार भाजपा 100 पार मध्ये दापोडीत कमळ फुलणारच – अमोल थोरात….
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी येथे प्रभाग क्रमांक 30 ची शक्ती केंद्र प्रमुख ,प्रमुख पदाधिकारी यांची बैठक विजयी संकल्प घेऊन मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली…! या बैठकीसाठी पिंपरी चिंचवड भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अमोलजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थीत होते…!
बूथ कार्यकर्ता , बूथ समिती गठीत करणे ,आगमी मनपा निवडणूक चर्चा , स्थानिक प्रश्नाबाबत विषय …या बैठकीत घेण्यात आले व येणाऱ्या मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 30 मध्ये भाजपाचे नगरसेवक करण्याचा निर्धार करण्यात आला….!
यावेळी बैठकीमध्ये प्रस्ताविक मनोगत व्यक्त करताना भाजपा जिल्हा सचिव विशाल वाळूंजकर यांनी शहर भाजपा कडून दापोडीतील सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच बूथ सक्षम करण्यासंदर्भातसर्व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख यांच्या वतीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले…!
स्वीकृत नगर सदस्य संजय कणसे,प्रकाश जवळकर ,
नंदू कदम, संजय शेंडगे,देवदत्त लांडे, रामदास भांडे,विशाल सातपुते , गणेश जवळकर ,स्वप्नील फ़ुगे,मनोगत व्यक्त केले,
यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अमोलजी थोरात यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे त्यांचे काम करण्याचे आश्वासन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये अब की बार भाजपा 100 पार करताना दापोडीतील नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांकडून करून घेण्यात आला , त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे निश्चितपणे विचार केला जाईल असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले…!
प्रभाग क्रमांक 30 च्या प्रभाग अध्यक्षपदी घनश्याम सकट यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांचा शाल गुच्छ अमोलजी थोरात यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला….!
या बैठकीमध्ये सागर फ़ुगे, रघुनाथ जवळकर, आबा कोळेकर, धर्मेंद्र क्षीरसागर , सुभाष सिंगल,सुधीर चव्हाण, अश्विन सपेरा, नाना डवरी,शांताराम जगधने,राजू कानडे, दत्ता कानडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत घनश्याम सकट व आभार सागर फुगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here