Home पुणे वाकडमधील पाच बाईक रायडर जवानांना मानवंदना देण्यासाठी साडेआठ हजार किलोमीटर प्रवास करणार;...

वाकडमधील पाच बाईक रायडर जवानांना मानवंदना देण्यासाठी साडेआठ हजार किलोमीटर प्रवास करणार; भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगतापांनी प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा

22
0

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0052.jpg

वाकडमधील पाच बाईक रायडर जवानांना मानवंदना देण्यासाठी साडेआठ हजार किलोमीटर प्रवास करणार; भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगतापांनी प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – उमेश पाटील

भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त वाकडमधील पाच बाईक रायडर तरूणांनी देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना मानवंदना देण्यासाठी पुणे ते अरुणाचल प्रदेशमधील काहो ते परत पुणे असा साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. या पाचही तरुणांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सुरक्षित प्रवासासाठी शनिवारी (दि. १२) शुभेच्छा दिल्या. देशभावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिमा राबवाव्यात, असे मत शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

देशभरात भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त वाकडमधील पाच बाईक रायडर तरुणांनी एकत्र येत देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. हे पाचही बाईक रायडर तरुण पुणे ते गुजरातमधील नारायण सरोवर पुढे अरूणाचल प्रदेशमधील काहो ते पुन्हा पुणे असा तब्बल ८ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या प्रवासाला त्यांनी आजपासून (शनिवार) सुरूवात केली आहे.

वैभव रहाटे, राहुल मोकाशी, संदीप कटके, राहुल हंकारे, महेंद्र शेवाळे असे त्या पाच बाईक रायडर तरुणांची नावे आहेत. त्यांची ही बाईक राईड इंडिया बुक रेकॉर्डस आणि एशियन रेकॉर्डसमध्ये नोंदवली जाणार आहे. या बाईक राईडला उद्योजक कुणाल मराठे यांनी प्रोत्साहन दिले आहे.

या पाचही तरुणांच्या प्रवासाला भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिमा राबवाव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, विनायक गायकवाड, संजय मराठे, साई कोंढरे, संकेत कुटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, याच पाच बाईक रायडर तरुणांनी २०१९ मध्ये कन्याकुमारी ते लद्दाख ते पुणे असा ८ हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी “से नो टू प्लॅस्टिक” म्हणजेच पर्यावरणाला धोका असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नका, असा संदेश दिला होता. या बाईक रायडची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड अँड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Previous articleअब की बार भाजपा 100 पार मध्ये दापोडीत कमळ फुलणारच – अमोल थोरात….
Next articleघर देता का कुणी घर श्रीकृष्ण फिरके अध्यक्ष ,संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ,काशिद पार्क.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here