Home पुणे घर देता का कुणी घर श्रीकृष्ण फिरके अध्यक्ष ,संत गाडगे बाबा ज्येष्ठ...

घर देता का कुणी घर श्रीकृष्ण फिरके अध्यक्ष ,संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ,काशिद पार्क.

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0055.jpg

घर देता का कुणी घर
श्रीकृष्ण फिरके
अध्यक्ष ,संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ,काशिद पार्क.
नोकरीचे निमित्ताने 38 वर्षे मुंबईला मुलुंड सारख्या उच्चभ्रू आणि स्वच्छ वस्तीत राहून 2012 साली काशिद पार्क ,पिंपळे गुरव येथे राहायला आलो .त्यावेळी नदीवर पुल नव्हता ,रस्ता नव्हता ! जास्तीत जास्त वस्ती गुंठेगिरीची ! मा . आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांचे प्रयत्नातून वरील सुधारणा तर झाल्यात ,परंतु इतरही अनेक सुधारणा झाल्यात.भाऊंच्या सारखा कामाचा तडाखा मी आजवर पहिला नाही.नगरसेवकांनी तर कमालच केली.नुसत्या फोनवरच काय मेसेज पाठविला तरी कामे होऊ लागली .आणि खरोखर ह्या गोष्टींचा अभिमान वाटायला लागला.
परंतु मी रहात असलेल्या काशिद पार्क ची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी होती.काशिद पार्क चे नाक असलेल्या कमान जवळ रोज अर्धा ट्रक कचरा पडत असे.त्याची दुर्गंधी जिकडे तिकडे पसरत असे.पावसाळ्यात तर विचारूच नका ! मुलुंड सारख्या पॉश वस्तीत राहिल्यामुळे ही बाब मला खूप खटकली.मी त्यावेळचे बिजेपी कार्यकर्ते श्री तानाजीभाऊ जवळकर आणि आताचे वृक्षमित्र श्री अरूणशेठ पवार यांचे मार्फत भाऊंच्या कृपाशीर्वादाने स्वच्छता अभियान राबविले.तरीही लोक ऐकत नव्हते.शेवटी आठवड्यानंतर यश आले.आणि जेथे नाक दाबून चालावं लागे तेथे आता संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात सर्व जण खातात पितात एव्हढी स्वच्छता संघाच्या पुढाकाराने झाली.
दुसरे असे की नदीच्या घाण पाण्याचा तीव्र वास !मी मनपा आयुक्तांनी लोकांच्या सह्यांचे निवेदन दिले .पाठपुरावा केला , आणि एक दिवस आयुक्तांनी भाऊंना मीटिंगला बोलावले.त्यानंतर नगरसेवकांना बोलावून बुल डोझर ने बंधारा तोडला.आणि दुर्गंधी कायमचे नष्ट झाली.
त्याशिवाय सिग्नल बंद पडणे ,पाण्याची पाइप लाईन फुटणे ,कचऱ्याचे ढिगारे,गाड्यांची अनधिकृत पार्किंग ,स्वच्छता अभियान – आळंदी ,देहू ,सिंहगड ,सोमाटणे , BRT रोड स्वच्छता असे एक ना अनेक उपक्रम संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाने राबविले.आता तर नुकताच स्वच्छतेच्या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महापालिकेच्या ‘ड ‘ प्रभागा तर्फे संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघास प्रशस्ती पत्र देऊन अति.आयुक्तांचे हस्ते गौरविण्यात आले.हे सर्व घडून येते माझ्या संघातील सन्माननीय सदस्यांचे मुळे.!त्यांची आपुलकी ,एक दुसऱ्याशी वागण्याची पद्धत ,प्रेमभाव ,आणि सहकार्य या गोष्टींचा मला अभिमान आहे !एकूण संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाने काशिद पार्क मध्ये क्रांती घडवून आणली असे अभिमानाने म्हणावेसे वाटते.याचे सर्व श्रेय राजकीय पुढारी ,संघाचे पदाधिकारी , सदस्य आणि नागरिक यांना जाते.मी मात्र निमित्त मात्र !
परंतु खेदाची बाब अशी की एक वाचनालय ची छोटी जागा सोडली तर संघास आजपर्यंत विरंगुळा केंद्र मिळू शकले नाही .आता साहित्य वाढले.ठेयायला जागा नाही.दिंडोरी प्रणित केंद्राने ज्येष्ठांचा अपमान करून आम्हास मंदिरातून बाहेर काढले.आता हरिपाठ सुद्धा इकडे तिकडे म्हणावा लागतो .म्हणून संघाचा अध्यक्ष म्हणून म्हणतो ,”घर देता का कुणी घर !”
श्रीकृष्ण फिरके
अध्यक्ष ,संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ,काशिद पार्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here