*धोनी पाठोपाठ अवघ्या ४० मिनिटात सुरेश रैनाने पण केले आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला बाय बाय:*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन ४० मिनीटंही झाली नाही तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच दोन क्रिकेटरने एकाच दिवशी ४० मिनीटांच्या गॅपने निवृत्तीची घोषणा केली असावी.
” माही, तुझ्यासोबत खेळने हा एक चांगला प्रवास होता. अतिशय़ अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे, ” अशी पोस्ट रैनाने केली आहे.
सुरेश रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळला असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १७ जुलै २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला असून तो भारतीय संघात कमबॅकसाठी प्रयत्न करत होता.
