• Home
  • *चीनच्या पहिल्या कोरोना लशीला* *मिळाला पेटंट*

*चीनच्या पहिल्या कोरोना लशीला* *मिळाला पेटंट*

*चीनच्या पहिल्या कोरोना लशीला* *मिळाला पेटंट*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

चीनची पहिली कोरोनावरील लस AD5-nCoV ला पेटेंट मिळालं आहे. या लशीला चीनच्या सैन्याचे मेजर जनरल चेन वेई आणि CanSino Biologics Inc या कंपनीने मिळून बनवलं आहे. चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार लशीला पेटेंट मिळालं आहे. चीन या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी जगातील अनेक देशांमध्ये करत आहे. यावर्षीच्या शेवटपर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे.
नॅशनल इंटेलेक्चुएल प्रॉपर्टी अँडमिनिस्ट्रेशनने चीनच्या लशीला पेटेंट मिळाल्याची माहिती दिली आहे. 18 मार्च रोजी या लशीच्या पेटेंटसाठी अर्ज करण्यात आला होता. 11 ऑगस्ट रोजी या लशीला पेटेंट मिळालं आहे. चीन सुरक्षित आणि प्रवाभी लस तयार करण्यासाठी योग्य दिशेने पुढे जात असल्याचा दावा तेथील तज्ज्ञांनी केला आहे.
लशीला डिसेंबर महिन्यापर्यंत लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.
देशाची लोकसंख्या 2 कोटी 38 लाख; कोरोना रुग्ण फक्त 481
तिसऱ्या टप्प्यात लस प्रभावी आहे का, याचे परिक्षण केले जाईल असं चीनकडून सांगण्यात आलं आहे. जर ही लस यशस्वी ठरली तर याला बाजारात आणले जाईल. लशीला अजून मंजूरी मिळाली नसली तरी चीनने आपल्या सैनिकांना ही लस देणे सुरु केले आहे. पीपप्ल लिबरेशन आर्मीच्या मदतीने तयार करण्यात आलेली लस मोठ्या प्रमाणात सैनिकांना दिली जात आहे.
चिनी सैनिकांमध्ये जैविक आणि संक्रमित आजारापासून लढण्याची क्षमता आहे आणि चीन याचा पूरेपूर फायदा घेत असल्याचं कॅनबरातील चाईना पॉलिसी सेंटरचे प्रमुख एडम म्हणाले आहेत. CanSino ची कोरोना लस चिनी सैन्यासोबत मिळून तयार करण्यात आली आहे. CanSino ने आपली चाचणी आणि लस बनवण्याच्या क्षमतेने विरोधी अमेरिकेची मॉडर्ना, फाईजर, क्योरवैक आणि अस्त्राजेनेका यांना खूप मागे टाकले आहे, असं एडम म्हणाले आहेत. चिनी सैन्याचे मेडिकल साईन्सचे प्रमुख चेन वेई यांनी CanSino च्या लस निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
कोरोनाविरोधात लढाई जिंकणारे जगातील नऊ देश!
दरम्यान, जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. सध्या 140 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील लस तयार करण्यामध्ये गुंतले आहेत. अनेक उमेदवार मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. शिवाय रशियाने लस तयार केल्याचा दावा केला असून नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोना विषाणूला रोखणारी एक प्रभावी लस तयार होण्याची शक्यता आहे

anews Banner

Leave A Comment