• Home
  • *रिक्षा नव्हे स्वप्नातले घर*

*रिक्षा नव्हे स्वप्नातले घर*

*रिक्षा नव्हे स्वप्नातले घर*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते; परंतु जागेच्या वाढत्या दरामुळे अनेकांची ही इच्छा अपूर्णच राहते. तामीळनाडूमधील २३ वर्षीय अरुण प्रभू या तरुणाने मात्र आयडियाची कल्पना लढवत आपले हे स्वप्न अवघ्या एक लाख रुपयांत पूर्ण केले आहे. चक्क रिक्षामध्ये त्याने आपले ड्रीम हाऊस साकारले असून त्याचे घर सध्या आसपासच्या गावांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. इंटरनेटवरदेखील त्याच्या घराचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
अरुण हा तामीळनाडूचा नमक्कम पारामधी केल्लोरचा रहिवाशी आहे.
स्वतःचे घर घेण्याची अरुणची इच्छा होती. त्यासाठी त्याने काही स्लम भागात भेट दिली. साधी झोपडी घ्यायचे म्हटले तरी त्यासाठी ४ ते ५ लाख रुपये मोजावे लागतात. त्यात टॉयलेटची सुविधादेखील नसते. त्यामुळे त्याने सेकंड हॅण्ड बजाज रिक्षाचे रूपांतर आलिशान घरात केले आहे. सोलो ०.१ असे नाव त्याने घराला दिले आहे.

रिसायकल वस्तूंपासून हे घर तयार करण्यासाठी त्याला ५ महिन्यांचा कालावधी लागला आहे. फक्त ३६ स्क्वेअर फुटांच्या घरात त्याने बेडरूम, लिव्हिंग रूम, टॉयलेट, बाथरूम बनवले आहे. याशिवाय ६०० वॅटचे सोलार पॅनल आणि २५० लिटरची पाण्याची टाकीदेखील बसवली आहे.

anews Banner

Leave A Comment