Home Breaking News महेंद्रसिंग धोनी ची क्रिकेट मधिल निवृती सर्वाना खुप वेदनादायी ठरली

महेंद्रसिंग धोनी ची क्रिकेट मधिल निवृती सर्वाना खुप वेदनादायी ठरली

140
0

महेंद्रसिंग धोनी ची क्रिकेट मधिल निवृती सर्वाना खुप वेदनादायी ठरली आहे, विष्णू अहिरे(युवा मराठा न्युज विभागीय संपादक नाशिक) जो सय्यम मैदानावर धोनी नी पाळला तो आज प्रयन्त कुणामधे पाहिला नाही, धोनी मैदानावर असताना कधी पराभवाची भिती वाट्ली नाही, अनेक हातातून गेलेल्या मैचेस हया लढवया वीराने एकहाती जिंकून दिल्याचे आपण पाहिले आहे, मैच बघत असताना प्रेक्षकांच्या तोंडी आपल्या कितिही विकेट पडत असल्यातरी धोनी आहे ना भाऊ मग काही भिती नाही येवढा प्रभावी क्रिकेट प्लेयर धोनी च्या रुपात भारतिय क्रिकेट ला गवसला होता, मैच हरलो जिंकलो तरी हया माणसाच्या चेहर्यावरील भाव सारखेच,तुम्ही बघीतले असेल विश्वचषक जिंकलो तेव्हा आपले खेळाडु किती जलोश करीत होते आणी हा खेळाडू नेहमीप्रमाणे वावरत होता. झारखण्ड मधे फुटबॉल खेळणारा हा खेळाडू कधी जगाच्या नकाशावर क्रिकेट मध्ये नाव कायम स्वरूपी कोरून ठेवेल, खरे पाहिले तर आजही त्याचे एकदिवसीय संघात निच्चीत होते व येणारा विश्वचषक तो खेळू शकत होता पन त्याने स्वताला ओळखले वय बघता निवृती घेणे योग्य समजला व कुणाचा ही सल्ला न घेता निवृत झाला, येवढा महान जरी होता तरी निवृती घेताना त्याने सोशल मिडिया वर टाकलेले गणे बघा मे पल दो पल का शायर हू पल दो पल मेरी कहाणी हे, मुझसे पहले कितने शायर आये और चाले गये, हेच त्याचे मोठेपण, आज भारतिय क्रिकेट संघाला अलविदा करुन त्याने नविन खेळाडूला जागा करुन दिली पन त्याची क्रिकेट रसिक जनतेच्या मनातील जागा कुणी नाही घेऊ शकणार हे निस्चीत,

Previous article*रिक्षा नव्हे स्वप्नातले घर*
Next articleभावपुर्ण श्रध्दांजली, सलामीला सुनिल गावस्कर सोबत अनेक शतकी भागिदारी करणारा भारतिय क्रिकेट मधिल भूतपुर्व सलामी फलंदाज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here