• Home
  • **माहीचा (MSD) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय*

**माहीचा (MSD) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय*

**माहीचा (MSD) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनी (M S Dhoni )याने निवृत्ती ची एक मोठी घोषणा केली आहे. T20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटलाही त्याने अल्विदा केलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक, T20 विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी या ICC च्या तीनही महत्त्वाच्या स्पर्धा धोनी कर्णधारपदी असताना भारताने जिंकल्या आहेत.त्यामुळे MSDला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जात होतं. कॅप्टन कूलने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे. धोनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्त झाला असला, तरी IPL मध्ये मात्र तो दिसत राहणार आहे.

anews Banner

Leave A Comment