*सत्तेसाठी ना पदासाठी धडपड नेहमी* *जणतेसाठी*
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)
*पेठ वडगांव शहरात सुसज्ज* *कोविड सेंटर आणि काही* *प्रलंबित कामासाठी निधी* *मिळावा यासाठी पेठ वडगांव* *शहरातील यादव* *आघाडीच्या वतीने राज्याचे जलसंपदा* *मंत्री मा.जयंत पाटील* *यांच्याकडे केली मागणी* *केली.*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात सद्या कोरोना बाधित रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरातील खासगी रूग्णालयामधे अपुऱ्या सोयी आणि बेडची कमतरता असल्याने कोरोना बधित रूग्णाची संख्या नियंत्रित करण्यासाठी वडगांव मधे सर्वस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.
पण व्हेंटीलेटर व आँक्सिजन या सारख्या सोयीचे सुसज्ज कोविड सेंटरची गरज असुन शहरात तातडीने कोविड सेंटर सुरू करावे यासह काही प्रलंबित कामासाठी यादव आघाडीच्या वतिने राज्याचे जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील याना निवेदन देऊन तसेच पेठ वडगांव शहरात ऐत्याहासिक सरसेनापती धनाजीजाधव स्मारकासाठी ५० लाखांचा निधी मिळावा आणि छत्रपती शाहुमहाराज (शाहुकालीन) महालक्ष्मी तलावासाठी डागडुजीसाठी ५० लाखांचा निधी तातडीने मिळावा यासाठी पेठ वडगांव शहरातील यादव आघाडीच्या शिष्टमंडळाने मंत्री जंयत पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी मंत्री जंयत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधुन तातडीने वडगांव शहरात सुसज्ज कोविड सेंटर सुरू करणेबाबत व प्रलंबित कामासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अश्या सुचना दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक मा.राजकुमार पोळ , काँग्रेसचे शहरअध्यक्ष मा.सचिन चव्हाण , कोरोना योद्धा मा.आभिजीत गायकवाड ,अजित बारवडे ,विवेक दिंडे , राहुल माने ,नितिन सणगर ,सचिन पाटील , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
