Home अकोला अकोला येथे वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न.

अकोला येथे वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0030.jpg

अकोला येथे वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न.
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र चा , 11 वा वर्धापन दिन सोहळा, कंचनपुर अकोला जि. अकोला येथे ह.भ.प.विठ्ठल पाटील (काकाजी) यांचे मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात संपन्न झाला. अकरावा वर्धापन दिना निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी ह.भ.प.गुरूवर्य मल्लीकार्जुन आप्पा महाराज यांचे हस्ते ग्रंथ पुजन, विणा पुजन व सम्मेलन उदघाटन झाले. पारायन सोहळा ह.भ.प. जगदीश (लल्ला) महाराज यांचे हस्ते घेण्यात आले. संत गजानन महाराज महिला मंडळ यांनी सहभाग घेतला.तसेच वारकरी संप्रदायाच्या सेवेबद्दल विठ्ठल वारकरी पुरस्कार अकोला पंचायत समिती सभापती मा. सौ.सुलभाताई सोळंके यांचे हस्ते देऊन जेष्ठ महाराज मंडळींना सन्मानीत करण्यात आले, संपर्क प्रमुख जितेंद्र कोलप यांनी वारकरी साहित्य परिषद चा मागील दहा वर्षाचा इतिहास व पुढील धोरणे आपल्या प्रास्ताविकात मांडले, या वेळेस अकोला जिल्हाध्यक्ष ह.भ.प. शिवशंकर महाराज पाटील, ह.भ.प.राजेंद्र महाराज वकटे, ह.भ.प.विठ्ठल महाराज महल्ले, भगवान महाराज साबळे, गोपाळ महाराज बदरखे, लक्ष्मण महाराज म्हावरे, अवधूत महाराज पारसकर,अमोल महाराज बांगर, मनोहर महाराज वाघमारे, मोहन महाराज वाघमारे आदी उपस्थित होते. ह.भ.प.मल्लीकार्जुन आप्पा महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. संत गजानन महाराज मंदिर येथून पायी दिंडी काढण्यात आली, यामध्ये अकोला, कंचनपुर, माजरी, मुर्तीजापुर, राजापूर,खांबोरा, मोरझाडी, हातरून, या गावच्या दिंड्या सहभागी होत्या, सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गजानन महाराज मंदिर येथून पायी दिंडी काढण्यात आली परिसरातील सर्व, दिंडी झाल्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

Previous articleरास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न !
Next articleअब की बार भाजपा 100 पार मध्ये दापोडीत कमळ फुलणारच – अमोल थोरात….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here