Home बुलढाणा रास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न !

रास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न !

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0068.jpg

रास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न !

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर/ तालुक्यातील निरोड येथे रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर पोहचणारा शिधा वाटप काही तांत्रिक कारणांमुळे शिधापत्रिकाधारकांन पर्यंत पोहचू शकला नाही, परंतु शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा केली होती. मात्र सर्व रास्त दुकानांवर ही भेट पोहचण्यास विलंब झाल्याने थोडे उशिराने तिचे वाटप केले जात आहे.
यावर्षी प्रथमच शिंदे-फडणवीस सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रास्त धान्य दुकानांवर केवळ १०० रुपयांमध्ये शिधा वाटप करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही दिवाळी भेट रास्त धान्य दुकानांमध्ये पोच करण्यात आली आहे. यामध्ये १०० रुपये इतक्या माफक किंमतीत १ किलो चणाडाळ,२ किलो रवा,१ किलो साखर,१ लीटर पामतेल अशा प्रकारच्या वस्तूंचा आनंदाचा शिधा म्हणून शिधापत्रिकाधारकांना दिला आहे. निरोड येथील रास्त धान्य दुकानावर नुकतेच हा आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आला. यावेळी निरोड रास्त धान्य दुकानचालक प्रतिक प्रमोदराव देशमुख यांनी शिधापत्रिकाधारकांकडे हा आनंदाचा शिधा सुपूर्द केला. यावेळी गावंचे सरपंच स्वप्निल अवचार,पोलिस पाटील सचिन साबे, दत्ता पाटील,अनूप देशमुख, धनंजय वसंतराव देशमुख, गजानन जुमळे, जयवंत बोरसे, विजय शेंडे, विष्णू जाधव सह बहुसंख्य गावातील शिधापत्रिकाधारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here