Home बुलढाणा संग्रामपुर तालूक्यात बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर,...

संग्रामपुर तालूक्यात बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा

38
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20221113-063214_Google.jpg

संग्रामपुर तालूक्यात बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर :- तालूक्या मध्ये बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा.
संग्रामपुर तालुक्यातील बंदी असलेला गुटखा महागला असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असली तरी संग्रामपुर तालूक्या मध्ये जागोजागी गुटखा विक्री होतांना दिसून येत आहे त्यामुळे गुटखा बंदी कोठे आहेत ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत.
गुटखा बंदीचे अधिकारी नावालाच ? कोठे गुटखा असेल किंवा विक्री होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल करावा यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते मात्र संग्रामपुर तालूक्या मध्ये गुटखा विक्री खुलेआम सुरू आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी कोठे आहेत ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. गुटखा बंदीचे अधिकारी नावालाच असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात असून महाराष्ट्र शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केलेली असली तरी संग्रामपुर तालूक्या मध्ये ठीक ठिकाणी गुटखा विक्री होत आहेत गुटखा मोठ्या व्यापाऱ्यांकडून सहज उपलब्ध होत असल्याने जागोजागी मिळत आहेत त्यामुळे गुटखा विक्रीची इच्छा नसतानाही गुटखा विक्री करावी लागते असे काही टपरी चालक बोलत असल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहेत.
१० रुपयाला मिळणारा गुटख्याची पुडी आता १२ रुपयाला विक्री होत आहेत तर २० रुपयाला मिळणारी गुटखा पुडी २५ रुपयाला विक्री होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत.
व्यापाऱ्यांनी गुटखा पुड्याचे भाव वाढविल्याने टपरी चालकांनीही गुटखा पुडीचे भाव वाढविले असल्याचे बोलल्या जात आहेत टपरी चालकाने दहा ऐवजी 12 रुपयांची मागणी ग्राहकाकडे केल्यानंतर टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलल्या जात असून टपरी चालक त्रस्त झाले असल्याची चर्चा चांगलीच परिसरात सुरु आहे.
बंदी असलेला गुटखा संग्रामपुर तालूक्या मध्ये खुलेआम सुरू आहेत त्यामुळे हे अपयश अधिकाऱ्यांचे आहेत की कर्मचाऱ्यांचे ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत.

Previous articleनांदगाव पोलिसांनी आवळ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या. 
Next articleरास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here