🛑 रेल्वेने लँकडाऊन वाढवला! पुढील तारखेपर्यत गाड्या बंद रहाणार! 🛑
✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतरही या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करणं, अद्याप शक्य झालेलं नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा स्थितीतच रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने लॉकडाऊन वाढवला असून 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास दूरच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे रेल्वेच्या साहाय्याने प्रवासाची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
कोव्हिड-19 मुळे जवळपास 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. त्यातच रेल्वेने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने 14 एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व रेग्यूलर वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. या बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. रेल्वेचे याबाबत मत स्पष्ट आहे की, सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठी अजून बराच कालावधी जाईल.
कोरोनामुळे होणार भयंकर परिणाम
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवर या वर्षाचा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 4.5 टक्क्यांनी घसरेल आणि हे घसरण ऐतिहासिक असेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यात आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे ही मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पण यासोबतच 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी तेजी असेल आणि आर्थिक विकासदर हा 6 टक्क्यांपर्यंत जाईल, असा दिलासाही नाणेनिधीने दिला आहे…⭕