🛑 पुण्यात आणखी एक परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
पुणे २६जून :⭕ लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्याच्या इतर भागांप्रमाणेच पुणे शहरातही कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रीन झोन असलेले परिसर आता मात्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. अशात पुणे शहरातील आणखी एक परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
शहरातील बी.टी. कवडे रस्ता आणि परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 26 ते 30 जूनपर्यंत या परिसरात सकाळी 7 ते 9 दूध विक्रीला परवानगी असेल, तर सकाळी 9 ते 7 दवाखाने आणि औषधाची दुकाने खुली राहतील. बी.टी. कवडे रस्ता केवळ माल वाहतूक आणि अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या वाहतुकीसाठी खुला राहील, अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे….⭕
