• Home
  • पुणे शहरात मास्कचा वापर अनिवार्य; न लावल्यास पाचशे रुपये दंड ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे शहरात मास्कचा वापर अनिवार्य; न लावल्यास पाचशे रुपये दंड ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे शहरात मास्कचा वापर अनिवार्य; न लावल्यास पाचशे रुपये दंड 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे 26 जून:⭕शहरातील करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत पुण्यातील प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे आदेश पुणे महापालिकेने काढले असून, घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही पुणेकरांना मास्कचा वापर करावा लागणार आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्या किंवा त्याचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून पाचशे रुपये तडजोड शुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साथ रोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा संपूर्ण देशभरात लागू केला आहे. या दोन्ही कायद्यान्वये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे आहेत. त्यानुसार, संपूर्ण शहरामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्याचे आदेश बुधवारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले. महापालिकेच्या सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांना नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे मास्कचा वापर न करता नागरिक वावर करत असल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून पाचशे रुपये तडजोड शुल्क आकारले जाणार आहे.

हे शुल्क भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशा नागरिकांवर पोलिसांतर्फे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

शहराच्या पूर्व भागांत बी. टी. कवडे रोड परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने २६ ते ३० जून या कालावधीसाठी हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत दूध, औषधे आणि दवाखाने वगळता इतर सर्व व्यवहार पूर्ण बंद राहतील. तसेच, बी. टी. कवडे रस्ता केवळ मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू राहणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment