Home बुलढाणा संग्रामपूर भाजपा वैद्यकीय आघाडी संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी डॉ.अमोल धुर्डे

संग्रामपूर भाजपा वैद्यकीय आघाडी संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी डॉ.अमोल धुर्डे

36
0

आशाताई बच्छाव

1000282256.jpg

संग्रामपूर भाजपा वैद्यकीय आघाडी संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी डॉ.अमोल धुर्डे

(ब्युरो चीफ बुलढाणा) संग्रामपूर : भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी वरवट बकाल येथील आई चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे संचालक, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल संपतराव धुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ.संजय कुटे यांच्याहस्ते नुकतेच याबाबतचे नियुक्ती पत्र डॉ.धुर्डे यांना दिले आहे. डॉ.अमोल धुर्डे मूळचे जामोद गावचे असून ते अनेक वर्षापासून राजकारणात सक्रीय आहेत.
त्यांच्याकडे जळगांव जामोद भाजप तालुका कोषाध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे.
वैद्यकीय सेवा करतांना संग्रामपूर तालुक्यातही त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय आघाडीच्या तालुका अध्यक्षपदाची आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आल्याचे बोललं जात असुन त्यांच्या या नियुक्तीने सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleनिफाड येथे शिक्षक समितीचा भव्य‌‍‌‍‌‍‍‌‍‍‍‍‍‍‍‍‌‌‍‌‍‍‌ शैक्षणिक मेळावा व श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात
Next articleआदर्श शिक्षक संपतराव कासोद यांचे 93 व्या वर्षी निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here