Home नाशिक निफाड येथे शिक्षक समितीचा भव्य‌‍‌‍‌‍‍‌‍‍‍‍‍‍‍‍‌‌‍‌‍‍‌ शैक्षणिक मेळावा व श्री स्वामी समर्थ महाराज...

निफाड येथे शिक्षक समितीचा भव्य‌‍‌‍‌‍‍‌‍‍‍‍‍‍‍‍‌‌‍‌‍‍‌ शैक्षणिक मेळावा व श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात

95
0

आशाताई बच्छाव

1000282228.jpg

निफाड येथे शिक्षक समितीचा भव्य‌‍‌‍‌‍‍‌‍‍‍‍‍‍‍‍‌‌‍‌‍‍‌ शैक्षणिक मेळावा व श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

निफाड येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय रसलपुर फाटा येथे श्री स्वामी समर्थ गृप व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा निफाड यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव समिती निफाड यांच्या संयुक्त वतीने आयोजित भव्य‌‍‍ शैक्षणिक व अध्यात्मिक मेळाव्यात रक्तदान शिबिरासह गुणवंत शिक्षकांचा सत्कार,उपक्रमशील व आदर्श शाळा पुरस्कारार्थी शिक्षकांचा व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा सन्मान ,सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा तसेच उपक्रम शील कर्मचारी व अधिकारी यांचा गुणगौरव व नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी व पालकांचा सत्कार आदी ‍‍‌विविध सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षक वृंद स्वामी भक्तांचे साक्षीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे व प्रतिमांचे पूजन करून तसेच दिप प्रज्वलनाने करून करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व उपस्थितांनी अर्पण रक्तपेढी द्वारे राष्ट्रास रक्तदान अर्पण करून व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित भव्य महाप्रसादाचे सेवन करून करण्यात आली.याप्रसंगी श्री स्वामी समर्थ संकल्पसिद्धी या स्तोत्र नित्यपूजा सेवा पुस्तिकेचे मान्यवरांचे शुभहस्ते प्रकाशन करणेत आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे माजी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डिले यांनी केले.मनोगत तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन निफाड तालुका शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष नवनाथ सुडके यांनी केले.स्वागत तालुकानेते अविनाश बागडे व सरचिटणीस खंडु किट्टे यांनी केले
आभार समितीचे निफाड तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी मानले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, शिक्षक समितीचे माजी राज्य उपाध्यक्ष व श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त मा राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डिले यांच्या नेतृत्वात निफाड तालुका शिक्षक समिती दरवर्षीच शिक्षक विद्यार्थी कर्मचारी अधिकारी यांच्या गुणगौरवाबरोबरच,सेवानिवृतांचा सत्कार, रक्तदानासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचे ही प्रसार व प्रचाराचे पुण्यकर्म अव्याहतपणे विसाव्या वर्षी सुद्धा सुरू ठेवले असून शिक्षक विद्यार्थी यांचे हिताबरोबरच शिक्षक समितीचे हे कार्य केवळ विद्यार्थी व शिक्षक घडविणारेच नाही तर समाजही घडविणारे आहे असे गौरवोद्गार काढले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य शिक्षक नेते काळूजी बोरसे पाटील यांनी निफाड समितीचे कार्य हे विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच समाजालाही प्रेरणादायी आदर्श व अनुकरणीय असेच असून समितीचे ब्रीदवाक्य त्याग व सेवा हे खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाने सिद्ध केल्याची प्रशंसा केली. निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल यांनी न्यायाची चाड व अन्यायाची चीड या समितीच्या बिद्र वाक्याप्रमाणे समिती परिवारातील सर्व शिक्षक आधी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता व नंतर शिक्षकांचे प्रश्न या न्यायाने कार्य करीत असून शिक्षक समितीने आयोजित केलेल्या आजचा कार्यक्रम निश्चितच शिक्षकांना विद्यार्थी घडवण्यासाठी मोठे पाठबळ देणारा व प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही व हे काम करतांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पुण्य लाभेल असेच आहे असे गौरवोद्गार काढले.समितीचे राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर ,विभागीय अध्यक्ष सुनील भामरे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विद्या पवार, शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत आदर्श आचार संहितेचे पालन करत समितीने आदर्शवत कार्य केले आहे, शिक्षक समिती निफाड शाखा व समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेच्या चेअरमन,व्हा चेअरमन,कार्यवाह,संचालक मंडळाचे कामकाजाचे कौतुक करत मोठ्या प्रमाणात ठेवी ठेऊन कर्ज पुरवठा करणेसाठी सहकार्याचे आवाहन करून जिल्हाभरातील शिक्षक बांधवांच्या प्रशासकीय अडचणी संदर्भात बदली संदर्भात मार्गदर्शन करून शिक्षक समिती नेहमीच शिक्षक व विद्यार्थी हितासाठी सदैव समर्थ असल्याचे सांगितले .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, पदाधिकारी मा कोषाध्यक्ष केदुजी देशमाने, राज्यउपाध्यक्ष आनंदा कांदळकर, विभागीय अध्यक्ष सुनिल भामरे,विभागीय सचिव प्रकाश सोनवणे,राज्य कार्यकारिणी सदस्य संजयबाबा पगार, एन पी एस राज्य उपाध्यक्ष श्रीकांत देवरे राज्य सदस्याआशा भामरे यांचेसह निफाड तालुक्याचे विद्यमान गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल ,माजी गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार ,शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे,वसंत गायकवाड,सौ लता भरसट,माजी शिक्षणविस्तार अधिकारी सोन्याबापू थोरात लेखाधिकारी फसाळे,पं स कक्षाधिकारी शेळके यांच्यासह समितीचे विभागीय अध्यक्ष सुनिल भामरे,विभाग सचिव प्रकाश सोनवणे समितीचे जिल्हा नेते जिभाऊ बच्छाव जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार यांचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पवार, शिवाजी बर्गे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक थोरात, जगन्नाथ बिरारी, शिवाजीराजे शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष शैलेश आहेर,सुनिल सांगळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दत्तू कारवाळ,राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत यांचेसह प्रमोद बच्छाव, विकास देवरे, हेमंत पवार सुधाकर पवार,जुगराज ठाकरे ,सचिन शिंदे ,अशोक पवार ,भास्कर राक्षे मोनाली देशमुख ,कैलास शिंदे, अंबादास मोरे,विजय देवरे ,किरण गांगुर्डे विजय पवार, मुकुंद भोजने,बाळासाहेब पगार,राजेंद्र नांदूरकर ,रविकांत सोनवणे,भाऊसाहेब कांगणे अशोक कासार,संदीप काकड,ज्ञानेश्वर चव्हाणके,विजय सोनवणे, प्रमोद ब्राह्मणकर, भगवान सोनवणे,मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय बैरागी, बाळकृष्ण पठाडे,भास्कर भदाणे,शंकर रायते, वाळीबा कदम,यशवंत वाणी संतोष मेमाणे,संतोष गांगुर्डे, सुरेश धारराव प्रमोद क्षिरसागर,रामदास चोभे,शंकर सांगळे,विश्वास सानप,अमोल झोले,किरण निंबेकर,पोपट मोरे,उत्तम सोनवणे,संजय गुजर,सोपान गंभीरे,नवनाथ डुमरे,क्रांतीकर खडताळे,प्रदीप कुटे,गजानन परिहार, बाबूलाल शिंदे,नरेंद्र पवार,रजनी सोनवणे,अनिता अहिरे,देवयानी अहिरे,अजय जाधव आत्माराम न्याहरकर,दर्शन पवार,स्नेहल पाटील,श्रीमती आढाव
यांचे सह शिक्षक समितीचे सर्व राज्य विभागीय जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्ष ,शिक्षक नेते सरचिटणीस, पदाधिकारी व समिती शिलेदार,पुरस्कारप्राप्त शिक्षक बंधू भगिनी,सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी माजी राज्यउपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले,राज्यप्रतिनिधी अनंत गोसावी,राज्य कार्य कारिणी सदस्य रवींद्र चव्हाणके,जिल्हा संघटक दत्तू सानप,रमेश गांगुर्डे श्रीकांत देवरे,संपर्कप्रमुख राजेंद्र पवार तालुका नेते अविनाश बागडे,तालुका अध्यक्ष संजय गवळी,कार्याध्यक्ष नवनाथ सुडके,सरचिटणीस खंडु किट्टे,सहचिटणीस दत्ता साळवे,कोषाध्यक्ष भगवान बर्डे,संघटक दिलीप कातकाडे,उपाध्यक्ष नंदकिशोर घोडेकर,योगेश शिंदे,दयानंद कवडे,मुकेश सोनवणे,निलेश निरभवणे, निलेश येवले,किशोर नवसारे,भाऊ खालकर,संदीप ओहळ,मरगु चौघुले,सोमनाथ मुरकुटे,प्रवीण शिंदे,विजय शिंदे,संजय बोराळे,दत्तू निफाडे,शिवाजी जाधव,मुजीब शहा,रविंद्र बागुल,दादा,बोरसे,नरेश्वर ठाकूर,प्रकाश शिरसाठ,दीपक पाटील,अजित वलटे,प्रफुल्ल शिवदे,देविदास वाघ ,सचिन गिते,गिरीश पवार,प्रदीप देवरे,केदुजी साळवे,संजय ठाकरे,जिभाऊ गुजरे, हिरामण पवार,अशोक जाधव,सरदार पडवाळ,शशिंद्र सोनवणे,साहेबराव जाधव,साहेबराव सोनवणे,एकनाथ नाईकवाडी,प्रशांत खोलासे,बाळासाहेब साळुंखे,रमेश आडे,नरेंद पवार,संजय पवार,पंकज कापडणीस,दिपक बागुल,दिपक सुरंजे,मच्छिंद्र बोरसे,रामराव धुळे,विष्णू पवार,विनायक आहेर,प्रमोद खाटेकर , शशी जाधव ,राजू भोये,भानुदास दिघे,आदिनाथ शिरसाठ, किशोर सोनेरी,राजेश गुंजाळ,नामदेव सोनवणे जितेश वाचकौरे रावसाहेब डावरे समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेच्या चेअरमन सौ मनिषा कर्डीले व्हा चेअरमन सौ सुनिता किट्टे,कार्यवाह सौ सुशिला सोनवणे सर्वच संचालक मंडळ,सौ अवंतिका गोसावी,सौ स्मिता सुडके,सरिता वाणी,विजया नवसारे,अरुणा पुंड,रत्ना बागुल,अनिता दरेकर,निर्मला शिंदे,निर्मला पेखळे,माधुरी कुमावत हेमलता पगार, रंजना खैरनार,कुंदा निकम,जयश्री पवार महिला आघाडी तालुका अध्यक्ष श्रीमती वैशाली गांगुर्डे,मंदाकिनी भागवत,आरती बैरागी,दिपाली ठाकूर,सौ सिमा बैरागी,सारिका डबे,जयश्री वाघ,शोभा खाडे,कविता घोडेकर भारती पाटील,मनिषा सांगळे,स्नेहल निकम आदींसह शिक्षक समिती पदाधिकारी श्री स्वामी समर्थ गृप व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा निफाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकरी सुखी व्हावा,शेतमालाला चांगला भाव मिळावा,पावसाळा ऋतूत चांगला पाऊस पडावा पिके चांगली यावी,संकटे दूर करा सर्वांचे रक्षण व्हावे,सन २००५ नंतरचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी,जिल्हा परिषद शाळा चांगल्या पद्धतीने सुरू राहून गुणवंत विद्यार्थी घडू द्या अशी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज व अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज गाणगापूर चरणी करणेत आली.दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिनी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ गृप व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती निफाडचे वतीनेश्री स्वामी समर्थ महाराज चरणी चिरंतन अभिषेक केला जातो.

श्री पांडुरंग कर्डीले मा राज्यउपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)

शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच, खंड पडू न देता गेली १९ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून सहकार्याचे मदतीचे बळावर उपक्रमशील शाळा,शिक्षक,अधिकारी,विद्यार्थी गुणगौरव,सेवानिवृतांचा सन्मान,रक्तदान शिबिर, महाप्रसाद आयोजन करण्याचे मा राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले,राज्य प्रतिनिधी अनंत गोसावी,राज्य समिती सदस्य रविंद्र चव्हाणके,जिल्हा संघटक दत्तू सानप,रमेश गांगुर्डे,श्रीकांत देवरे,राजेंद्र पवार,तालुका नेते अविनाश बागडे,तालुका अध्यक्ष संजय गवळी,कार्याध्यक्ष नवनाथ सुडके,सरचिटणीस खंडु किट्टे,सहचिटणीस दत्ता साळवे,कोषाध्यक्ष भगवान बर्डे,दिलीप कातकाडे,नंदकिशोर घोडेकर,योगेश शिंदे यांचेसह समितीचे सर्व पदाधिकारी यांचा उपक्रम गौरवास्पद आहे.तसेच निफाड शहरात संस्थापक पांडुरंग कर्डीले व त्यांचे सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद व समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थांची स्थापना करून स्वमालकीच्या इमारती उभ्या केल्या असून आदर्शवत कामगिरी केली आहे.

उदयजी शिंदे
मा राज्याधक्ष,राज्यनेते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

Previous articleमैत्री ही आयुष्याची शिदोरी असते
Next articleसंग्रामपूर भाजपा वैद्यकीय आघाडी संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी डॉ.अमोल धुर्डे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here