• Home
  • शहरातील ३१ उद्याने सुरू!प्रतिबंधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार

शहरातील ३१ उद्याने सुरू!प्रतिबंधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार

🛑शहरातील ३१ उद्याने सुरू!प्रतिबंधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕महापालिकेने राज्य शासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार शहरातील काही उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पालिकेच्या 204 उद्यानांपैकी 31 उद्याने उघडण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येणारी उद्याने मात्र तूर्तास बंदच ठेवण्यात आली असून 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील नागरिकांना उद्यानात येण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

शहरात पालिकेच्या मालकीची 204 उद्याने आहेत. प्रशासनाने लोकवस्ती, कोरोना रूग्णांची संख्या आदी गोष्टींचा अभ्यास करून 31 उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश काढण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासून ही उद्याने उघडण्यात आली. यामध्ये शहराच्या पूर्व भागातील 12, पश्चिम भागातील 5, उत्तर भागातील 5, दक्षिण भागातील 5 आणि मध्य भागातील 8 उद्यानांचा समावेश आहे. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असे एकूण चारच तास ही उद्याने उघडी राहणार असून केवळ चालणे, धावणे यासाठीच उद्यानांचा वापर करता येणार आहे. उद्यानात बसणे, गप्पा मारणे, गर्दी करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रतिबंधित आणि अन्य परिसरातील उद्यानांचा अभ्यास करून सर्वसाधारणपणे धोका संभावणार नाही आणि नियम व निकष पळाले जातील अशा भागातील उद्याने उघडण्यात आली आहेत. यामधून प्रतिबंधित क्षेत्र लगतचा परिसर आणि लहान उद्याने वगळण्यात आली आहेत. आकाराने मोठी, चालणे आणि धावणे शक्य होईल तसेच सुरक्षित अंतर राखता येईल अशाच उद्यानांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. असे घोरपडे यांनी संगीतले.
काय टाळावे
सामुदायिकपणे व्यायाम करणे.
गर्दी अथवा गट करून गप्पा मारणे.
उद्यानात विनाकारण बसून राहणे.
उद्यानांतील खेळणी, बाकडे, व्यायामाची साधने वापरणे.
वेळा सकाळी : 6 ते 8
संध्याकाळी : 5 ते 7

anews Banner

Leave A Comment