Home राजकीय महाराष्ट्र सरकारकडे कर्मचार्‍यांच्या पगारसाठी पैसे नाहीत!

महाराष्ट्र सरकारकडे कर्मचार्‍यांच्या पगारसाठी पैसे नाहीत!

122
0

🛑 महाराष्ट्र सरकारकडे कर्मचार्‍यांच्या पगारसाठी पैसे नाहीत!
घेणार ९ हजार कोटीचे कर्ज! 🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

महाराष्ट्र :⭕कोरोना संकटामुळे राज्य सरकारने विकासकामांवरील खर्चात तब्बल ६७ टक्के कपात घोषित केली असली तरी, वेतन आणि निवृत्तीवेतन देण्यासाठी किमान नऊ हजार कोटींचे कर्ज उचलायची वेळ आली आहे.

कोरोना संकटाने उभ्या केलेल्या अडचणीपैकी एक मोठी अडचण म्हणजे आर्थिक कोंडी, महसूल मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याने राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही समोर आर्थिक गाडे कसे हकलायचे हा पेच पडला आहे.
महाराष्ट्र राज्याचे वेतनदेयक १२ हजार कोटींच्या आसपास असताना मे महिन्यात जेमतेम साडेपाच हजार कोटी करापोटी तिजोरीत जमा झाल्याने आता कर्ज उचलण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या महिन्यातही नऊ हजार कोटी वेतन तसेच कोरोनाखर्चासाठी उचलेले गेले होते.
सध्या पोलिस आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी वगळता बहुतांश कर्मचारी सक्रीय नसल्याने त्यांना खासगी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांप्रमाणे काही महिने कमी वेतन देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा बड्या मंत्र्याने समोर आणल्याचेही समजते.

महाराष्ट्रात आजमितीस अंदाजे १७ लाख कर्मचारी तर, ७ लाख निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे देयक हा यापूवीर्ही चिंतेचा विषय ठरला होता. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा तसेच मदत पुनर्वसन विभाग वगळता अन्य सर्व खात्यांना खर्चास बंदी घालण्यात आली आहे. तरीही सध्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

जिल्ह्यात प्रवासी मजुरांच्या छावण्याही स्वयंसेवी संस्थांना मदतीला घेऊन चालवा असे तोंडी आदेश होते. जीएसटी वसुली, परतावा, विक्रीकर, स्टॅम्प ड्युटी अशा सर्व आघाड्यांवर मे महिन्याची वसुली अत्यल्प होती. जूनमध्येही आवकीत फार वाढ होण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारची आवक कमी असल्याने तिकडून तरी काय मिळणार? आडात नाही तर पोहाऱ्यात कसे येणार असा प्रश्न केला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पाणीपुरवठा या खात्यांना गेली काही वर्षे मोठा निधी मिळाला. मात्र यावेळी ते शक्य नाही.⭕

Previous articleशहरातील ३१ उद्याने सुरू!प्रतिबंधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार
Next articleखासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचे उपचार ऐकून हैराण व्हाल; वाचा पोलिसाचा अनुभव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here