आशाताई बच्छाव
मविआचे बळवंतराव वानखडे यांची उमेदवारी दाखल: अमरावती लोकसभा आखाडा; सुषमा अंधारे सर काँग्रेस नेत्यांची पहिली जाहीर सभा.
______________
दैनिक युवा मराठा
पीएन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
वानखडे यांनी आज, शनिवारी अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभेचे देशभरातीलअनुक्रमात सातव्या स्थानावर असलेला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. वानखडे यांनी एकाच वेळी चार प्रस्ताव (उमेदवारी अर्ज )सादर केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला. त्यांच्या अर्जात पक्षाच्या रकान्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय एन सी) असा उल्लेख आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने काँग्रेस नेत्या तथा माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, आणि राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बळवंतराव बाईक रआॅलईनए जिल्हा कचेरीवर पोचले होते. इतर मित्र पक्षाचे प्रतिनिधी ही त्यांच्यासोबत होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करताना पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश नसल्याने इतर नेतेमंडळीला जिल्हा कचेरी पासून विशीष्ट अंतरावर थांबावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर नेहरू मैदानात पहिली सभा पार पडली. यावेळी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचे सदस्य काँग्रेस तुकाराम भस्मे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर, माजी खासदार अनंत गुढे, माझी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख व यशोमती ठाकूर आदींचे भाषण झाली. आज दिवसभरात अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ५८ व्यक्तींनी ९५ अर्जाची उचल केली. काहींनी स्वतः तर काहींनी इतरांसाठी अर्ज विकत घेतल्याची नोंद आहे. पहिल्या दिवशी ४३ व्यक्तीद्वारे ७५ अर्जाची उचल करण्यात आली होती. आगामी ४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार असून ८ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होईल. आदर्श आचार संहिता गुरुवार ६ जून पर्यंत लागू राहणार आहे.






