Home अमरावती निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश: टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्यासाठी ३ दिवसाचा अवधी.

निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश: टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्यासाठी ३ दिवसाचा अवधी.

14
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_205200.jpg

निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश: टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्यासाठी ३ दिवसाचा अवधी.
____________
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हाप्रतिनिधी.
अमरावती.
लोकसभा निवडणुकीत टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करू इच्छा नाऱ्या कर्मचाऱ्यांनी विवाहित नमुना अधिसूचना निघाल्यानंतर पाच दिवसाच्या हात योगिता दस्तऐवजा सह अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे सूचना निवडणूक
प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. अधिसूचना गुरुवारी जाहीर झाल्याने व त्यानंतर शुक्रवार, रविवारची सुट्टी आल्याने, आता या मागणीसाठी केवळ तीनच दिवस उरले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे व इतरांनी यावेळी टपाली मत पत्रिकेच्या अनुषंगाने करायची कारवाई निवडणूक आयोगाच्या विविध सूचना तसेच निर्देश याबाबत आढावा घेतला. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांना टपाली मतपत्रिकेचे नमुना१२डी पुरविण्यात आले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करायचे आहे, त्यांनी नमुना भरून त्यांच्या कार्यालय प्रमुखाकडे घ्यावा. अशी सूचना निवडणूक यंत्रणेने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही नमुना १२डी उपलब्ध करून दिला आहे. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यापासून पाच दिवसाच्या आत नमुना भरून देणे आवश्यक आहे. निवडणुकीची अधिसूचना गेल्या गुरुवारी जारी झाली, त्यानंतर शुक्रवारी सुट्टी आता पुन्हा उद्या रविवारी सुट्टी असल्याने टपाली मतपत्रिकांची मागणी करणाऱ्यांच्या हातात तीनच दिवस उरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here