Home कोरोना ब्रेकिंग ज्या लोकांना रेशन कार्ड नाही अशा लोकांना सुद्धा ५ किलो ...

ज्या लोकांना रेशन कार्ड नाही अशा लोकांना सुद्धा ५ किलो तांदूळ मोफत मिळणार ..

115
0

ज्या लोकांना रेशन कार्ड नाही
————————————–
अशा लोकांना सुद्धा ५ किलो
————————————-
तांदूळ मोफत मिळणार …आता
————————————-
संबंधित तहसीलदार आणि
————————–
पुरवठा अधिकारी यांनी जनतेस
—————————————-
सहकार्य करावे तर रेशन दुकान
——––—————————–
दारांनी प्रामाणिक पणा
——————————-
दाखवावा– भारत पवार
————–
नासिक -( राजेंद्र वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) -कोरोना महामारी मुळे राज्यात लॉक डाऊन सुरू असून त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असून जनतेची परिस्थिती मोठी हालकीची झाली आहे म्हणून जनतेस थोडा धीर देत महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाने दि.19/5/2020 रोजी जी आर / परिपत्रक काढले की ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांना सुद्धा मोफत प्रति माणसी ५ किलो तांदूळ मे आणि जून अशा दोन महिन्याचा तांदूळ वाटप करण्याचा आदेश तथा जी आर शासनाने काढला आहे.
असे असून सुद्धा देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील रेशन दुकानदार कार्ड असून सुद्धा मोफत तांदूळ देत नाही तर ज्यांना कार्डच नाही त्यांना तर दुकानावर उभचं करत नसल्याने संबंधित माळवाडी च्या रेशन दुकानदारास देवळा येथील तहसीलदार व पुरवठा निरीक्षक( अधिकारी) यांनी त्वरित कानमंत्र दयावा तसेच रेशन दुकान सलग एक महिना रेग्युलर चालू ठेवावे हा शासनाचाच नियम असून हे महाशय हप्ताभर सुद्धा दुकान चालू ठेवत नाहीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची उघडणी करावी अशी ही येथे मागणी होत असून माळवाडीतील रेशन दुकानदाराची अशी हुकूमशाही असून देवळा मालेगाव,कळवण,सटाणा तालुक्यासह जिल्यातील रेशन दुकान दारांची रेलचेल कशी आहे? याबाबत त्या त्या अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शोध मोहीम राबवून शासनाचा जी आर अर्थात अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नासिक जिल्याचे पालक मंत्री ना.छगन भुजबळ साहेब यांनी काढलेला जी आर सार्थकी लावून भुजबळ साहेबांचे हाथ मजबूत करावेत तर मोफत तांदूळ वाटपा बाबत नागरिकांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी संपादक/पत्रकार आणि प्रेस संपादक,पत्रकार सेवा संघाचे नासिक जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा माहिती अधिकार का.महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत पवार यांनी नासिक जिल्हाधिकारी , जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच
देवळा तहसीलदार शेजुळ सो.व पुरवठा निरीक्षक यांचे कडे व्हाट्सआप न्यूज द्वारे केली आहे . तर अधिकाऱ्यांनी जनतेस सहकार्य करावे तर रेशन दुकान दारांनी प्रामाणिकतेला जागावे असे ही पवार यांनी म्हटले असून याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास लोकडाऊन संपल्यावर याबाबत आपण लेखी तक्रार जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. भुजबळ साहेब तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खंडापुरकर यांना प्रत्यक्ष भेटून देणार असल्याचे ही भारत पवार यांनी शेवटी सांगितले.

Previous articleतुम्हाला माहीत आहे का? लॉकडाऊन सुरू झाल्यापासून किती लोकांना केले क्वारंटाइन!
Next articleखासदार, आमदारांची मान्सून पुर्व आढावा बैठक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here