Home कोरोना ब्रेकिंग तुम्हाला माहीत आहे का? लॉकडाऊन सुरू झाल्यापासून किती लोकांना केले क्वारंटाइन!

तुम्हाला माहीत आहे का? लॉकडाऊन सुरू झाल्यापासून किती लोकांना केले क्वारंटाइन!

98
0

⭕तुम्हाला माहीत आहे का? लॉकडाऊन सुरू झाल्यापासून किती लोकांना केले क्वारंटाइन!⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

जगभरासह देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची लागण झाल्याने रूग्णांचा आकडा देखील वाढतोय. हा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाकडून ४ लाख ३० हजार ६७० पास देण्यात आले आहे तर ५ लाख ६५ हजार ७२६ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात एकूण ५ लाखांहून अधिक क्वारंटइन

कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. असे असले तरी पोलिसांवर काही हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या २४८ घटना समोर आल्या आहेत. त्यात ८३० हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस विभागातील १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊन दरम्यान या फोनवर ९५ हजार ९११ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का देण्यात आला आहे, अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना क्वारंटाइन कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५ लाख ६५ हजार ७२६ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असून या संदर्भातील आकडेवारी राज्य सरकारने जाहीर केली आहे.

लॉकडाऊनमध्ये १ लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २२ मार्च ते २५ मे या लॉकडाऊन कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १५ हजार २६३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तर २३ हजार २०४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Previous articleजिल्ह्यात एकूण 383 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 121 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील (छ.प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय)
Next articleज्या लोकांना रेशन कार्ड नाही अशा लोकांना सुद्धा ५ किलो तांदूळ मोफत मिळणार ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here