• Home
  • खासदार, आमदारांची मान्सून पुर्व आढावा बैठक.

खासदार, आमदारांची मान्सून पुर्व आढावा बैठक.

*खासदार, आमदारांची मान्सून पुर्व आढावा बैठक…*

हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे मान्सून पूर्व आढावा बैठक पार पडली.या वेळी मा.नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने साहेब, काँग्रेस पक्षाचे आमदार राजूबाबा आवळे साहेब, भाजपाचेआमदार प्रकाश आण्णा आवाडे साहेब, इचलकरंजी नगराध्यक्षा स्वामी मॅडम, हातकणंगले नगराध्यक्ष जानवेकर साहेब, हुपरी नगराध्यक्षा गाठ मॅडम, उप नगराध्यक्ष तानाजी पवार साहेब, सभापती पाटील साहेब, उप सभापती राजु भोसले साहेब, प्रांत खरात साहेब, तहसीलदार उबाळे साहेब, बीडीओ जाधव साहेब, सर्व विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच सर्व विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत पूर परिस्थितीत काय काय नियोजन करावे लागेल या बध्दल संपूर्ण चर्चा झाली.
मान्सून थोड्याच दिवसात आपल्या राज्यात दाखल होईल.
त्यासाठी आत्ता पासून कामाला सुरुवात करावी.
आगोदरच आपल्या देशात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून आपण सर्वांनी शासनाचे नियम पाळावे.
असेही बैठकीत खासदार माने यांनी सांगितले.

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर* .

anews Banner

Leave A Comment