• Home
  •   🛑 पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यास सुरवात 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

  🛑 पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यास सुरवात 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

 

🛑 पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यास सुरवात 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यास आज सुरवात झाली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यामध्ये पूल पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

पीएमआरडीने हाथी घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान गणेशखिंड रस्त्यावरून धावणाऱ्या मेट्रोला पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा बनला असल्याने तेथील दोन्ही पूल पडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार पूल पाडण्याचे काम आज मंगळवारी सकाळपासूनच सुरु झालेले आहे.

हे पूल पुणे महापालिकेच्या मालकीचे असल्याने २ दिवसांपूर्वी पीएमआरडीला पुणे महापालिकेकडून ‘एनओसी’ देखील दिली गेली आहे.

पूल पाडण्याचे काम एकाच वेळी न करता ते तीन टप्प्यात केले जाणार आहे. यामध्ये सुरवातीस चतुर्श्रुंगी येथील, दुसऱ्या टप्प्यात बाणेरच्या दिशेने जाणारा आणि शेवटी औंधच्या दिशेने जाणारा पूल पाडण्यात येणार आहे…⭕

 

 

 

 

 

 

anews Banner

Leave A Comment