• Home
  • 🛑 पौड रस्त्यावर लाँकडाऊन मधे मेट्रोच्या कामगारांच्या कामाचा आवाज…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पौड रस्त्यावर लाँकडाऊन मधे मेट्रोच्या कामगारांच्या कामाचा आवाज…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पौड रस्त्यावर लाँकडाऊन मधे मेट्रोच्या कामगारांच्या कामाचा आवाज…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोथरुड (पुणे) :⭕ लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात असल्याने संपूर्ण कोथरुडमध्ये मुख्य रस्ते व चौकामध्ये शुकशुकाट जाणवत होता. पौड रस्त्यावर मेट्रोचे काम चालू असल्याने तेथे मात्र यंत्रांचा आणि कामगारांचा आवाज ऐकू येत होता. जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण टाळेबंदी असल्याने कोथरुडमधील मेडीकल वगळता सर्व दुकाने बंद होती.

गुजरात कॉलनी येथील रस्ता गेले महिनाभर बंद असल्याने येथील बाजारपेठेत असलेली एक दोन दुकानेच उघडत होती. आज ती सुध्दा दुकाने बंद होती. सुतार दवाखाना परिसरात भाजीपाल्याच्या गाड्यांमुळे गर्दी असायची. तेथे दवाखान्यात आलेल्या गाड्यांव्यतीरीक्त कुठेही वर्दळ दिसत नव्हती. थोरात उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, म्हातोबा मंदिर परिसरात सुध्दा शुकशुकाट होता.

शास्त्रीनगरमधील अण्णासाहेब पाटील शाळा येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या प्रयत्नातून हे केंद्र कोथरुडमध्ये सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोना असल्याचा संशय असणारांची झटपट तपासणी करणे शक्य झाले आहे. पावसाचा त्रास होवू नये म्हणून पाटील शाळेच्या मैदानावर पत्र्याची शेड टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कदम म्हणाले की, कोथरुडमध्ये काल 176 जणांचे स्वॅब टेस्टींग केले. तर 114 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यातील 39 जण पॉझिटिव्ह आढळले.

कोथरुडमध्ये काल पर्यंत 1181 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 801 कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 360 जणांवर उपचार सुरु आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment